कोपरखैरणे व घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत घर नं. 481, बोनकोडे गाव, से. 12 डी़ कोपरखैरणे व रुम नं.194, से.02, कोपरखैरणे यांनी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामास कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 08 मजूर, 01 गॅस कटर, 02 ब्रेकर, 1 पीकअप व्हॅन तैनात होते.
त्याचप्रमाणे घणसोली कार्यक्षेत्रातील साई विजय अपार्टमेंटच्या बाजूला, अर्जुनवाडी, घणसोली तसेच शोभा अपार्टमेंट जवळ, अर्जुनवाडी, घणसोली या दोन्ही ठिकाणी विनापरवानगी अनधिकृतपणे आरसीसी जोत्याचे काम प्रगतीपथावर होते. या दोन्ही बांधकामधारकांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार दोनही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-12, ब्रेकर-3, जेसीबी-1, गॅसकटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे