महाराष्ट्र

“गर्जा महाराष्ट्र – महाराष्ट्राची गौरव गाथा” राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा

सध्याच्या कोरोनाच्या काळात मुलांच्या उपक्रमशिलतेला चालना मिळावी, आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली गोष्टींची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यातून त्यांच्यात महाराष्ट्राभिमान रुजवावा आणि विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त (Education beyond textbook) ज्ञान वाढावे या उद्देशाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज आणि लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी *महाराष्ट्राच्या गौरवाशी निगडीत ऐतिहासिक घटना, ठिकाणे, व्यक्ती, प्रसंग यावर आधारित स्वतःची कला जसे की, भाषण, गाणे, नृत्य (डान्स), एखादे आर्ट, ऍक्टिव्हिटी, Presentation, प्रोजेक्ट किंवा त्यांना जे सुचेल, आवडेल ते स्वत: सादर करून त्याचा 3 ते 4 मिनिटाचा व्हिडीओ रेकॉर्ड करावा आणि तो Growing Dots या मोबाईल ऍप वर अपलोड करायचा आहे.

१ ली ते १२ वी पर्यंतच्या ४ गटांसाठी (प्रत्येकी) पहिले बक्षीस ५००० रुपये, दुसरे ३००० रुपये, तिसरे २००० रुपये आणि ५० उत्तेजनार्थ बक्षि‍सांसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल. ह्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळांमधून प्रत्येक जिल्यातील एका शाळाचे व्यवस्थापन Growing Dots Education Platform च्या माध्यमातून पूर्णपणे डिजिटल केले जाणार आहे.

ह्या स्पर्धेत शाळांना रजिस्टर करण्याची आणि उपक्रम अपलोड करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२१ ही आहे. ह्या ऑनलाईन प्रदर्शनाचे १ मे २०२१ महाराष्ट्र दिनी उदघाटन होईल आणि त्यानंतर सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल.

स्पर्धेचे सर्व नियम समजून घेण्यासाठी Growing Dots हे Android मोबाइल App त्वरित download करा.

Growing Dots app download link: https://bit.ly/3e2QQyB

हा उपक्रम राबविण्यासाठी विमल आपटे एज्युकेशन ट्रस्ट (गोवा), दृष्टी – व्हिजन फॉर फ्युचर (पुणे), स्नेहालय – युवानिर्माण, (अहमदनगर), ऍपल मिडिया वर्क्स (पुणे) या संस्थांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Helpline (For Any Query)
90227 69199 | 94225 05478

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button