“आपला नगरसेवक कसा असावा”?
कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणूका पुढे ढकलल्या असल्या तरी निवडणुकीची ओढ मात्र कायम आहे. कोणीहि उठतोय सुटतोय मी नगरसेवक असे मिरवत बसतोय. प्रत्येक जण आपल्या परीने सामाजिक तसेच लोकांची कामे करताना दिसतोय.
लॉकडाउनमुळे प्रिंट मीडिया घरपोच पोहोचत नाही तरी मुख्यतः फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टा, ट्विटर च्या माध्यमातून बातमी लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. नवी मुंबई वार्ता आपणासाठी लवकरच निवडणूक २०२१ या सदराखाली, “आपला नगरसेवक कसा असावा?” हे सदर घेऊन येत आहे. प्रत्येक वॉर्डचा आपण अभ्यास करणार आहोत. तरी आपण सर्वानी आपली मत मांडावीत जेणेकरून आपण सर्व बाबींचा त्यात विचार करून आपला “नगरसेवक” कसा असेल? हे समजू शकेल. आपण कोणाला आणि का मत द्यावीत हे स्पष्ट्पणे समजू शकेल.
आपले महत्वाचे मत आपण अशा एका लायकी नसलेल्या माणसाला दिले तर तो पाच वर्षे सत्ता उपभोगेल. म्हणून आपण आपले महत्वाचे मत अशा माणसाला (भावी नगरसेवक) दिले पाहिजेल कि जो समाजाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल. काही महाभाग असे पण आहेत कि त्यांना वाटते कि आपणच लोकांचे कर्ते धर्ते आहोत, बाप आहोत. अशा माणसाला आपल्या एका मताची किंमत किती आहे हे दाखवून त्याची लायकी दाखवली पाहिजेल.
फक्त दिखाव्यासाठी लोकांची कामे करायची असे आजकाल दिसते. खरच तो माणूस (भावी नगरसेवक) मनापासून काम करतो का हे आपण पाहिले पाहिजेल. नाहीतर नंतर पाच वर्षे आपल्याला त्याच्यापुढे हात-पाय जोडावे लागतील. म्हणून आपण सर्वानी एक तरी मत मांडावे अशी मी विनंती करतो.
नवी मुंबई वार्ताने, अशा एका लायकी नसलेल्या माणसाची पोलखोल केली तरी या सदरचा “आपला नगरसेवक कसा असावा?” उपयोग होईल आणि आपल्या एका मताची किंमत वाया जाणार नाही.
हि अपेक्षा करतो.