युवा मूर्तिकार, चित्रकार आरती शर्माने पर्यावरण पूरक गणपती मूर्ती मेकिंग कार्यशाळेत २००० आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी मोफत प्रशिक्षण दिल्याबद्दल नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
ठाणे: ठाणे येथील कला आणि पर्यावरण संवर्धनाची संकल्पना घेवून स्केचो अॅक्टीवीटी सेंटरची स्थापना करणारी युवा मूर्तिकार, चित्रकार आरती शर्मा यांना नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले. नाशिक येथील नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक निलेश आंबेडकर यांनी त्यांना जागतिक विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले. त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की युवा मूर्तिकार, चित्रकार आरती शर्माने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून जनजागृती तसेच गणपती मूर्ती मेकिंग कार्यशाळेत २००० आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी मोफत प्रशिक्षण दिल्याबद्दल जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
आरती शर्मा पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे निस्वार्थ प्रशिक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी मोफत ऑनलाइन व ऑफलाइन सातत्याने देत आहेत. शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा ठाणे मुबंईतील विविध शाळा, वृद्धाश्रम, घरामध्ये बच्चेमंडळींसह जेष्ठापर्यंत ते परदेशी जपानी विद्यार्थ्यांनपर्यंत त्यांनी कार्यशाळा घेतल्या असून त्यातून आता पर्यंत २००० पेक्षाही अधिक जणांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
प्रदूषण विरहित व घरगुती नैसर्गिक विसर्जनाची सुरवात व्हावी यासाठी मूर्तिकार चित्रकार आरती शर्मा स्वतःच्या हातांनी बाप्पाची इकोफ्रेंडली मूर्ती साकारण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र कार्यशाळेत शिकवतात. या पर्यावरण क्षेत्रात भारत देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून पर्यावरण संदेश देण्याऱ्या आरती शर्मा यांचा प्रयत्नाची कामाची दखल घेवून नाशिक मधील नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांची नोंद घेतली आहे.
यावेळी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल आरती शर्मा म्हणाल्या कि माझी जबाबदारी वाढली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर जनजागृती व्हायला हवी सर्वच गणेशमूर्ती शाडूच्या तयार व्हायला हव्या त्यासाठी मूर्तीकारांचे प्रश्न समजून घ्यायला हवेत, अशी अपेक्षा मूर्तीकार चित्रकार आरती शर्मा यांनी व्यक्त केली. या निमित्ताने पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक माहितीसाठी ९३७२२२३६११ या क्रमांकांवर संपर्क साधावा.