यामिनी डोगरा कंग ने ‘डेझल मिसेस इंटरनेशनल’ मुकुट जिंकला
(मुंबई प्रतिनिधी) नवी मुंबईचे नाव नेहमीच राष्ट्रीय स्तरावर चांगल्या कामांसाठी नावाजले जाते. त्यात आणखी एक नाव समाविष्ट करण्यात आले आहे ते म्हणजे नवी मुंबईत राहणाऱ्या यामिनी डोगरा कंग हिचे. यामिनीने नुकत्याच दिल्लीत आयोजित केलेल्या ‘डेझल मिसेस इंटरनेशनल’ या सौंदर्य स्पर्धेचा मुकुट आपल्या नावे केला.
यामिनीने सिंगापूर एअरलाइन्समध्ये पूर्व कॅबीन क्रयु म्हूनन काम केलेले आहे. तिचे वडील भारतीय सैन्यात होते. तसेच यामिनीचे पती मास्टर मरीन आहेत. यामिनी डोगरा कंग ह्या सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असतात. गिरीजा अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमासाठी त्यांनी नेहमी मदत केली आहे.
२५ सप्टेंबर २०२१ रोजी यामिनी डोगरा कंग ने ‘डेझल मिसेस इंडिया इंटरनॅशनलचे’ विजेतेपद पटकावले. तसेच त्या ५ डिसेंबर २०२१ रोजी कोरियामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेतेपदाची तयारी करत असून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यामिनी डोगरा कंग ने तिच्या यशस्वी प्रवासाबद्दल सांगितले की, “एका स्त्रीला पुढे जाण्यासाठी घरातून प्रत्येकाच्या पाठिंब्याची गरज असते. मला सर्वांकडून हा पाठिंबा मिळाला. म्हणूनच मी ही महत्वाची सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. भविष्यात मला आंतरराष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धा जिंकायची आहे. म्हणूनच मला सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत. भविष्यात समाजासाठी मी नेहमी काम करत राहीन. याद्वारे मला समाजात योगदान द्यायचे आहे.”