नवी मुंबई

महिलेचा आवाज काढुन डॉक्टर असल्याचे सांगुन ज्वेलर्स व मेडीकल स्टोअर यांची फसवणुक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा पोलीसांकडुन अटक, ४ गुन्हे उघडकीस

नवी मुंबईतील परिसरात महिला डॉक्टर आहे असे सांगुन महिलेचा आवाज काढुन ज्वेलर्सला सोन्याचे दागिणे बनवायचे आहेत. तसेच मेडीकल स्टोअर येथे डॉक्टर असल्याचा बनाव करून मेडीकल मधील प्रॉडक्ट हॉस्पीटलमध्ये पाठवा असे खोटे सांगुन बांगडयाचे माप व अॅडव्हान्स रक्कम घेण्यासाठी घरी / हॉस्पीटलमध्ये बोलावुन आरोपीकडे काही रूपये ज्यात २००० / – रूपये दराच्या नोटा असल्याने त्या बदलुन ५०० / – रु दराच्या नोटा बदलण्याच्या खोटा बहाना करून, ५०० / – रु. दराच्या नोटा आणलेल्या इसमास फसवुन त्याचेकडुन रोख रक्कम घेवुन फसवणुक झाल्याबाबत नवी मुंबई आयुक्तालय परिसरातील पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त झाल्याने गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष मोहीम राबवुन कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त सो, नवी मुंबई श्री. बिपीनकुमार सिंह, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. श्री. जय जाधव, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. महेश घुर्ये नवी मुंबई यांनी आदेशीत केले आहे. त्यानुसार श्री. सुरेश मेंगडे पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई व श्री. विनोद चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली नवी मुंबई आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेकडुन महिलेचा आवाज काढुन फसवणुक करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले यांनी मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखा, नवी मुंबई मधील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार केले. मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक / ज्ञानेश्वर भेदोडकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून तसेच केलेल्या तांत्रिक तपासावरून रबाळे पोलीस ठाणे, गुन्हा रजि. क्र. ३७८ / २०२१ भा.द.वि.सं. कलम ४२० या गुन्हयाचे समांतर तपासादरम्यान पनवेल व सायन, मुंबई परिसरात सापळा रचुन आरोपी नामे १) मनिष शशिकांत आंबेकर, वय ४४ वर्षे, मुळ रा. पळस्पे गाव, ता. पनवेल, जि. रायगड. सध्या रा. नारासोपारा (ईस्ट), पालघर २) अँथोनी तय्यप्पा जंगली, वय ३७ वर्षे, रा. माटुंगा, मुंबई यांना दिनांक १२/१०/२०२१ रोजी अटक करण्यात आले. अटक आरोपीकडे केलेल्या तपासात अलिबाग, पेण, वाशी, गुजरात येथे देखील त्याचे साथीदारासह गुन्हे केल्याची कबुली दिली. गुन्हयातील मुख्य आरोपी मनिष शशिकांत आंबेकर याचेवर यापुर्वी अशाच प्रकारचे फसवणुकीचे एकुण २० गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचे केलेल्या तपासात आरोपींनी गुन्हयात वापरलेली कार, रोख रक्कम व इतर असा ५,०१,५०० / – रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत :
सदर गुन्हयातील मुख्य आरोपी मनिष शशिकांत आंबेकर हा महिलांचा आवाज काढून सोन्याचे दागिने बनवायचे असल्याचे खोटे सांगुन बांगडयाचे माप व अॅडव्हान्स रक्कम घेण्यासाठी घरी / हॉस्पीटलमध्ये बोलावुन आरोपीकडे काही रूपये ज्यात २००० रुपये दराच्या नोटा असल्याने त्या बदलुन ५०० रु दराच्या नोटा बदलण्याच्या खोटा बहाना करून , ५०० रू दराच्या नोटा आणलेल्या इसमाकडुन त्यास फसवुन त्याचेकडुन रोख रक्कम घेवुन फसवणुक करतो .

तसेच मेडीकल मध्ये फोन करून महिलेचा आवाज काढुन डॉक्टर असल्याचे खोटे सांगुन मेडिकल मधुन प्रोडक्ट हॉस्पीटलमध्ये पाठविण्याबाबत खोटे सांगुन आरोपीकडे काही रूपये ज्यात २००० रुपये दराच्या नोटा असल्याने त्या बदलुन ५०० रु दराच्या नोटा बदलण्याच्या खोटा बहाना करून, ५०० रू दराच्या नोटा आणलेल्या इसमाकडुन फसवुन त्याचेकडुन रोख रक्कम घेवुन फसवणुक करतो.

आरोपींकडुन उघड झालेले गुन्हे :
१) रबाळे पोलीस ठाणे , गुन्हा रज. क्र. ३७८ / २०२१ भादविस कलम ४२०, ३४
२) वाशी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. २५९ / २०२१ भादविस कलम ४२०
३) पेण पोलीस ठाणे, जि. रायगड गुन्हा रजि. क्र. २०२ / २०२१ भादविस कलम ४१९, ४२०, ३४
४) अलीबाग पोलीस ठाणे, जि. रायगड, गुन्हा रजि. क्र १६७ / २०२१ भादविस कलम ४२०, ४०६

गुन्हयातील मुख्य आरोपी मनिष शशिकांत आंबेकर, वय ४४ वर्षे, याचेवर यापुर्वी दाखल असलेले गुन्हे :

सदरची उल्लेखनीय कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले, सपोनि ज्ञानेश्वर भेदोडकर, पोलीस अंमलदार – नितीन जगताप, किरण राउत, अजय कदम, विजय खरटमोल यांनी केलेली असुन गुन्हयाचा तपास सपोनि ज्ञानेश्वर भेदोडकर, मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखा, नवी मुंबई हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button