स्त्री शक्ती पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा वाशीत सन्मान; सहावा राज्यस्तरीय स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा थाटात संपन्न
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(नवी मुंबई) गेली ११ वर्षे सातत्याने अशोकपुष्प प्रकाशनच्या वतीने नाट्य, साहित्य, गजल, शैक्षणिक, पत्रकारिता व चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. तसेच दर वर्षी महिला दिनाचे औचित्य साधत क्षेत्रातील नऊ कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षी कोव्हीड मुळे लांबणीवर पडले होते. त्यामुळे सोहळ्याचे आयॊजन गुरुवार दिनांक ९ डिसेंबर २०२१ ला वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या थाटात करण्यात आले.
अशोकपुष्प प्रकाशन च्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या या पुरस्काराने यावेळी पार्श्वगायिका किर्ती किल्लेदार, टीव्ही 9 मराठीच्या पत्रकार वृषाली पाटील, ॲथेलेट कुहू भोसले, उद्योजिका आसमा सय्यद, समाजसेविका परी मेहता, ज्योती पाटील, सायबर ट्रेनिंग मोटिवेशनल स्पीकर रेश्मा साळुंखे, बृहमुंबई महानगरपालिका सीबीएसई चेंबुर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा ढोले, न्युट्रोटॉनीस्ट सायली भोसले या कर्तुत्ववान नवशक्तींचा सन्मान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त महिलांना प्रथम महापौर नवी मुंबई महानगरपालिका व माजी खासदार डॉ. संजीव नाईक, सुप्रसिद्ध अभिनेता कश्यप परुळेकर (पानिपत, तप्तपदी, मन उधान वाऱ्याचे, व स्टार प्रवाह वरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेत नेतोजी पालकर यांची दमदार भूमिका साकारणारे), सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या जयंती या चित्रपटाचे मुख्य अभिनेते ऋतुराज वानखडे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व राज्य मराठी चित्रपट परीक्षण समितीचे सदस्य प्रकाश बाविस्कर, सेवन हिल हॉस्पिटलचे डीन डॉ. बाळकृष्ण अडसूळ, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकभाऊ मुंडे, निर्माते संदीप नगराळे, युवानेते निशांत भगत, डॉ. श्रृणाल जाधव, जमीन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निलेश पवार, अभिनेते रवी वाडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्या बरोबरच यावेळी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी अनुभवास मिळाली. महाराष्ट्राचा लाडका लावणी सम्राट आशिमीक कामठे, आव्हान लाईव्ह बँड, आर डी सी चे मॅक्स कुमार व होरीजन डान्स अकॅडमीचे मेघा सोनवणे, राहुल गुप्ता यांच्या एफ डी एस च्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकलीत.
कार्यक्रमाचे आयोजन अनघा लाड व उमेश चौधरी आणि सूत्र संचालन स्मिता गवाणकर यांनी केले.