कुणी कचरा कुंडी देता का ?
नवी मुंबई स्वच्छता अभियान दरम्यान कोपरखैरणे येथे कचरा कुंडी मुक्त अभियान नवी मुंबई महानगरपालिका कोपरखैरणे विभाग अधिकारी अशोक मढवी यांच्याकडून राबविले गेले त्यावेळी कचरा कुंडीच्या ठिकाणी वेळेनुसार घंटागाडी येत असे त्यावेळी नागरिक कचरा हे घंटागाडी मध्ये टाकून द्यायचे आणि इतर वेळी कोणीही कचरा रस्त्यावर बाहेर फेकू नये म्हणून कचरा कुंडीच्या ठिकाणी एक सफाई कामगार तैनात असायचा. जेणेकरून कोणीही नागरिक कचरा बाहेर रस्त्यावर टाकत नसे.
पण मागील काही महिन्यापासून स्वच्छता अभियानची स्पर्धा संपली असल्या कारणाने बोनकोडे गावाच्या परिसरात घंटा गाडी वेळेवर न येणे किंवा कुठलाही सफाई कामगार कचरा टाकू नये हे सांगण्यासाठी तैनात नसतो. घंटा गाडी वेळेवर येत नसल्याने आणि कचरा टाकण्यासाठी कुठलीही कचराकुंडी उपलब्ध नसल्या कारणाने नागरिक कंटाळून कचरा हे रस्त्यावर फेकून देतात. कचरा रस्त्यावर फेकल्यामुळे बोनकोडे गावाच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना रस्त्यावरून चालताना नाका-तोंडावर रुमाल पकडावा लागतो. तसेच मच्छरांच्या प्रमाणात वाढ झाली असून मलेरिया सारखे आजार नागरिकांना होत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन वेळेनुसार घंटागाडी पाठवावी आणि एक सफाई कामगार तैनात ठेवावा किंवा कायमस्वरूपी कचराकुंडी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून बोनकोडे गावातील नागरिक कचरा हा कचरा कुंडीमध्ये टाकतील.
सदर घटनेची नवी महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने दखल न घेतल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास कचरा हा उचलून नवी मुंबई महानगरपालिका वॉर्ड ऑफिसमध्ये फेकून देण्यात येईल असा इशारा दिव्यादीप फाउंडेशन, नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. प्रदीप नामदेव म्हात्रे ह्यांनी दिला आहे.