पाणी समस्या तसेच उड्डाण पुलाचे बांधकाम संदर्भात शिवसेनेचे जेष्ठ नेते सुरेश कुलकर्णी साहेब यांनी आयुक्त अभिजीत बांगर ह्यांना दिले निवेदन:
तुर्भे प्रतिनिधी : दिनांक ११ ऑगस्ट रोजी शिवसेनेचे जेष्ठ नेते सुरेश कुलकर्णी साहेब यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर ह्यांना भेटून निवेदन दिले कि तुर्भे स्टोअर, इंदिरा नगर, गणपती पाडा, हनुमान नगर, आंबेडकर नगर यासह तुर्भे परिसरातील सर्वच भागांमध्ये काही महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. नियमित पाणीपुरवठा होत नाही. कधी कधी दोन-दोन तीन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नाही. तसेच अधिकारी वर्गाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
तसेच ठाणे-बेलापूर रोड तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर येथील मुख्य रस्त्यावर उड्डाण पुल बांधण्यात यावा जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल. या परिसरातील नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या रोज हा ठाणे-बेलापूर महामार्ग ओलांडावा लागत आहे. मागील कित्येक वर्षांमध्ये अनेक अपघात होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडले तसेच अनेकांना गंभीर दुखापत होऊन कायमचे अपंगत्व आले आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत लोक मृत्युमुखी पडले.
शिवसेनेचे जेष्ठ नेते सुरेश कुलकर्णी साहेब ह्यांनी आयुक्त साहेबांना ह्या दोन महत्वाच्या प्रश्नांवर लक्ष घालून ह्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात अन्यथा संपूर्ण तुर्भे प्रभागातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा दिला.
आयुक्त अभिजीत बांगर ह्यांनी पाणीपुरवठा समस्या व उड्डाण पुलाचे बांधकाम याबाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.