तुर्भे MIDC येथील वारली पाडा येथे गरजू नागरिकांना आवश्यक अन्नपदार्थाच्या किटचे वाटप करताना शिवसेनेचे माजी जेष्ठ नगरसेवक मा. सुरेशजी कुलकर्णी साहेब
सन्मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आणि आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब तसेच लोकप्रिय खासदार श्री. राजन विचारे साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार शिवसेना उपनेते श्री. विजय नाहटा यांच्या प्रमुख पुढाकाराने आणि संकल्पनेतून गरजू नागरिकांना आवश्यक अन्नपदार्थाच्या किटचे वाटप होत आहे.
त्या निमित्ताने आज तुर्भे MIDC येथील वारली पाडा येथे किटचे वाटप करण्यात आले.
सदर ठिकाणी शिवसेनेचे माजी जेष्ठ नगरसेवक श्री. सुरेश कुलकर्णी साहेब, उपजिल्हा प्रमुख श्री. दिलीप घोडेकर साहेब, शहर प्रमुख श्री. विजय माने साहेब, निवृत्त डी.सी.पी. श्री. दिलीप जगताप साहेब, उत्तर भारतीय सेलचे जिल्हा संघटक श्री. कमलेश वर्मा, उपशहर प्रमुख प्रदीप बी. वाघमारे, युवा सेनेचे सरचिटणीस प्रवीण कांबळे, तुर्भे विभाग प्रमुख विनोद मुके, तुर्भे नाका विभाग प्रमुख तय्यब पटेल आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेकडो नागरिकांनी किटचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले.