उरणचे पोस्ट ऑफिस जेएनपीटी येथे शिफ्ट : उरण तालुक्यातील नागरिक त्रस्त
उरण (दिनेश पवार) उरण तालुक्यातील शहरात पी ओ बेकरी, कोट नाका येथे असलेले पोस्ट ऑफिस जेएनपीटी शॉपिंग सेंटर, जेएनपीटी टाऊन शिप, येथे तातपुरत्या काळासाठी शिफ्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उरण शहरातील नागरिकांना खूपच त्रास होत आहे. उरण शहरातील पी ओ बेकरी, कोट नाका येथे असलेली पोस्ट ऑफिसची इमारत फार वर्षापूर्वीची असल्याने इमारतीची दुरावस्था झाल्याने तिचे बांधकाम करण्यासाठी व उरण नगरपरिषदने सदरची इमारत धोकादायक जाहीर केल्याने कधीही जीवितहानी किंवा वित्त हानी होऊ शकेल या उद्देश्याने सिनिअर सुप्रीडेंट नवी मुंबई डिविजन, पनवेल यांच्या आदेशाने पी ओ बेकरी, उरण इमारतीमधील पोस्ट ऑफिस सध्या तात्पुरत्या स्वरुपात जेएनपीटी टाऊन शिप येथे शिफ्ट करण्यात आले आहे.
पोस्ट ऑफिस जेएनपीटी येथे शिफ्ट केल्याने नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. उरण येथील नागरिकांना जेएनपीटी पोस्ट ऑफिसला जाण्यासाठी उरण ते जेएनपीटी रिक्षाला जायला ३० रुपये व यायला ३० रुपये लागतात. पैसा खर्च होतो त्याचप्रमाणे वेळेचा अपव्यय होतो.
कोट नाका येथील पी ओ बेकरी ची इमारत मोडकळीस आल्याने उरण परिषदने धोकेदायक इमारत जाहीर केल्याने तात्पुरत्या काळासाठी जेएनपीटी टाऊन येथे उरणचे पोस्ट ऑफिस शिफ्ट केले आहे. किती दिवसासाठी केले आहे ते सांगू शकत नाही. अधिक माहितीसाठी सिनिअर सुप्रीडेंट नवी मुंबई डिविजन पनवेल यांच्याशी संपर्क साधावा. ०२२-२७४६७९५९, २७४८३८८१ . संपर्क साधावा. रश्मी म्हात्रे (SPM) सब पोस्ट मास्तर उरण.
जेष्ठ नागरिकांना पोस्ट ऑफिस मध्ये (MIS) मंथली इंटरेस्ट स्कीम, SCSS, सिनिअर सिटीझन स्कीम, सेविंग खाते अशा अनेक् स्कीमसाठी जावे लागते. उरण येथे पोस्ट ऑफिस असल्याने खर्च होत नव्हते. आता जेएनपीटी टाऊन गेटपर्यंत रिक्शाला एकेरी भाडे ३० रुपये मोजावे लागतात. पुढे गेट ते पोस्ट ऑफिस चालत जावे लागते.
जेष्ठ नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे पोस्ट ऑफिस मध्ये नेट व लाईट नसेल तर दुसऱ्यांदा जावे लागते सर्वांचा विचार करता संबधित अधिकाऱ्यांनी उरणचे पोस्ट ऑफिस उरण शहरात ठेवण्याची लवकरात – लवकर व्यवस्था करावी अशी मागणी विमला तलाव मॉर्निंग कट्टाचे सर्व जेष्ठ नागरिकांनी केली आहे.