उरण मध्ये राष्ट्रवादीकॉंग्रेस कडून जाहीर निषेध:
उरण (प्रतिनिधी)
पेट्रोल, डिझेल, रसोई गॅसची दरवाढ करून सामान्य जनता तसेच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या शेतकरी विरोधी व लोक विरोधी धोरणांमुळे केंद्र सरकारचा शनिवार (दि. २२ ) मे रोजी उरण येथे राष्ट्रवादीकॉंग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादीकॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणी सभावनाताई घाणेकर, उरण तालुका अध्यक्ष मनोज भगत, जिल्हा उपाध्यक्ष भार्गव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष समाधान म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार, उरण शहर अध्यक्ष गणेश नलावडे, शहर महिला अध्यक्ष संध्या घरत, तालुका सरचिटणीस राजेश पाटील, तालुका सरचिटणीसभूषण ठाकूरप्र, दीप तांडेल, मागास वर्गीय तालुका अध्यक्ष मंगेश कांबळी, विभागीय अध्यक्ष गणेश पाटील, बाबा मुकरी, राजेश घरत, कैलास भोईर, संजय परदेशी आदी उपस्थित होते.