नवी मुंबई

‘स्वच्छोत्सव-2023’ अंतर्गत ‘महिला आयकॉन्स लिडींग स्वच्छता (WINS)’ पुरस्कार करिता अर्ज करण्याचे आवाहन

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

 ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत विविध उपक्रम राबविताना त्यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात असून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महिलांच्या स्वच्छता कार्यातील योगदानाचा सन्मान करण्याकरिता ‘महिला आयकॉन्स लिडींग स्वच्छता (विन्स) पुरस्कार 2023 (Women Icons Leading Swachhata (WINS) Award- 2023)’ या अभिनव उपक्रमाचे “स्वच्छोत्सव-2023” (“Swachhotsav-2023”) अंतर्गत आयोजन करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत उत्साहात “स्वच्छोत्सव-2023” (“Swachhotsav-2023”) साजरा करण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला व महिला संस्था यांच्याकडून ‘महिला आयकॉन्स लिडींग स्वच्छता (विन्स) पुरस्कार 2023 (Women Icons Leading Swachhata (WINS) Award- 2023)’ याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

“स्वच्छोत्सव-2023” (“Swachhotsav-2023) अंतर्गत अर्ज करणा-या सर्व इच्छुक नागरिक / संस्थांनी गटनिहाय किंवा व्यक्तिश: प्रस्तावासह आपला अर्ज नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात सादर करावयाचा असून अर्ज सादर करण्याच्या अंतिम दि. 05 एप्रिल 2023 आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी अर्जदारांनी आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण ऑनलाईन किंवा ऑफलाईन देणे बंधनकारक राहील.

     महिला आयकॉन्स लिडींग स्वच्छता Women Icons Leading Swachhata (WINS)
याकरिता पात्र अर्जदार व्यक्ती / संस्था (Eligible Applicants)अर्ज करणा-या व्यक्ती /संस्थेने खालील क्षेत्रामध्ये काम केलेले असावे. (Relevant Field)
1)महिला उद्योजक आणि चेंज एंजट    (Individual Women Enterprises and Change Agents) 2)महिला बचत गट (Self Help Groups) 3)लघु उद्योजक (Micro Enterprises) 4)स्टार्टअप अंतर्गत नवे उद्योजक (Startup) 5)अशासकीय संस्था (NGO’s)  A.Management of CT/PT’s and Septic  tank cleaning services B.Treatment Facilities – used water/  Septage C.Municipal Solid waste Collection, Transportation and processing (MRF, Composting, Waste to Wealth etc.) D.IEC & CB (Training and Services) E.Technology and Innovation (Other – to be specify)

“स्वच्छोत्सव-2023” (“Swachhotsav-2023) मध्ये महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून यामध्ये सहभागी होण्यासाठी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष येथे पाहण्यास उपलब्ध आहे. नवी मुंबई महानगरपालिका https://forms.gle/bfWrkwaQYFtUeZay5 या लिंकवर देखील अर्ज सादर करता येतील.

तरी या उपक्रमासाठी पात्र असणा-या व्यक्ती  / संस्था यांनी विहित वेळेत रितसर अर्ज सादर करून नवी मुंबई शहराच्या स्वच्छता कार्यात आपले योगदान द्यावे व स्वत:चा आणि शहराचा गौरव वाढवावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button