अनधिकृत झोपडपट्टी हटविण्याची विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे ह्यांची मागणी
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(प्रतिनिधी) नवी मुंबईतील नेरूळ, सेक्टर 10 येथे असलेल्या गावदेवी मंदिराच्या समोर झालेली अनधिकृत झोपडपट्टी हटविण्यासाठी नवी जिल्हा काँग्रेस ओ.बि.सि. सेल चे सहसचिव विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री ह्यांना दिले निवेदन.
नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर 10 येथे असलेल्या गावदेवी मंदिराच्या समोर झालेली अनधिकृत झोपडपट्टी हटविण्यासाठी नवी जिल्हा काँग्रेस ओ.बि.सि.सेल चे सहसचिव विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी प्रशासनासह सर्व संंबंधितांना महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका, मा. उपआयुक्त (अतिक्रमण विभाग) न.मु.म.पा., मा. विभाग अधिकारी ‘ब’ प्रभाग नेरूळ, नवी मुंबई यांना अनेकवेळा निवेदने दिली आहेत.
तसेच अतिक्रमणामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 चे अस्तित्वच धोक्यात येत आहे. त्यामुळे नेरूळ सेक्टर 10 येथिल गावदेवी मंदिराच्या समोर असलेले अनधिकृत झोपडपट्टी वर कारवाई करावी अशी मागणी नवी जिल्हा काँग्रेस ओ.बि.सि.सेल चे सहसचिव विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे केली. मात्र त्यांच्या निवेदनावर अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही.
नवी जिल्हा काँग्रेस ओ.बि.सि.सेल चे सहसचिव विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांच्या तक्रारी संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका, मा. उपआयुक्त (अतिक्रमण विभाग) न.मु.म.पा., मा. विभाग अधिकारी ‘ब’ प्रभाग नेरूळ, नवी मुंबई तातडीने दखल घेऊन नेरुळ सेक्टर 10 येथील गावदेवी मंदिराच्या समोर यांच्या आतिक्रमणबाबत कारवाईसाठी नेरूळ वार्ड चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 11 एप्रिल व 19 एप्रिल 2022 रोजी पत्र दिले होते. मात्र विभागीय उपआयुक्तांच्या या पत्रावर नवी मुंबई प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही असा आरोप नवी जिल्हा काँग्रेस नवी जिल्हा काँग्रेस ओ.बि.सि.सेल चे सहसचिव विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी केला.