नवी मुंबई
जेष्ठ नागरिकांकरिता छत्री वाटप कार्यक्रम संपन्न:
नवी मुंबई प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक ३२, घणसोली येथे आज जेष्ठ नागरिकांकरिता छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेष्ठ नागरिकांकरिता १०० छत्रांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाट्न शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री. द्वारकानाथ भोईर ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख श्री. भरतजी चव्हाण यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. वैशालीताई सुर्यकांत वाघमारे व सुर्यकांत वाघमारे यांनी केले होते.
यावेळी उपशहर प्रमुख सुर्यकांत मढवी, शाखा प्रमुख रुपेश मिश्रा व संजय देशमुख, विभाग प्रमुख महेश चोरगे व भरत चव्हाण, समाज सेवक सौरभ शिंदे तसेच मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.