नवी मुंबई

तुर्भे व घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागांतर्गत भु.क्र. 33, एव्हीमोटर्स, सेक्टर -19 ई, तुर्भे (वाशी) याठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता समासी जागेमध्ये 18.00 x 4.20 मी., 18.00 x 4.00 मी. व 22.00 x 3.50 मी. चे GI पत्राशेड Angel Beam लोखंडी शेड उभारले आहे. तसेच मार्जिनल स्पेसचा वाणिज्य वापर सुरु असून मागील समासी जागेत 1.20 x 2.20 मी. मोजमापाचे बाथरुमचे बांधकाम केलेले आहे.

या अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 53(1) अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु सदर ठिकाणी संबंधिताचा मार्जिनल स्पेसचा वाणिज्य वापर सुरु होता. सदर अनधिकृत लोखंडी शेडवर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ‍मोहिमेअंतर्गत सदर अनधिकृत लोखंडी शेड निष्कासित करण्यात आलेले असुन सदर मोहिमेसाठी तुर्भे विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थितहोते. ‍तसेच अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी / अंमलदार तैनात होते. या मोहिमेकरीता 08 मजुर, 01 जे.सी.बी. यांचा वापर करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे ‌घणसोली विभागकार्यालय क्षेत्रातील ग्रीन व्हीव अपार्टमेंट समोर, अर्जुनवाडी, घणसोली या ठिकाणी अनधिकृतपणे आरसीसी जोत्याचे काम प्रगतीपथावर होते. संबंधितांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्व नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.

या अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडकमोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार दोनही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-12, ब्रेकर-3, जेसीबी-1, गॅसकटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

या पूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button