न्यूज पेपर विक्रेत्यांना श्री. विजय नाहटा साहेबांचा मायेचा आधार:
कोरोना महामारीच्या काळात संचारबंदी आणि लॉक डाऊन जाहीर केल्याने सर्वांच्या प्रमाणे पेपर विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पेपर स्टॉल बंद असल्याने बहुतेक पेपर विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पेपर विक्रेत्यांनी आपले दुःख कामगार नेते प्रदीप बी. वाघमारे यांच्याकडे मांडले.
सदर पेपर विक्रेत्यांचे गाऱ्हाणे श्री.वाघमारे यांनी शिवसेना उपनेते, पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती श्री. विजय नाहटा साहेब यांच्याकडे मांडले असता साहेबांनी तात्काळ न्यूज पेपर विक्रेते स्टॉल धारक यांना अन्न पदार्थाचे किट वितरित करण्याच्या सूचना दिल्या. श्री. विजय नाहटा साहेबांच्या सुचने प्रमाणे प्रदीप बी. वाघमारे (शिवसेना उपशहर प्रमुख ) यांच्या हस्ते विजय नाहटा फाउंडेशन व नवी मुंबई शिवसेना यांच्या वतीने वितरित करण्यात येत असलेले अन्न पदार्थाचे किट वाशी येथील पेपर स्टॉल विक्रेत्यांना वितरित करण्यात आले.
यावेळी पेपर विक्रेत्यांनी आमचे दुःख श्री. विजय नाहटा साहेबांनी ओळखून आम्हाला रेशन पुरविले म्हणून श्री. नाहटा साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त केले.