टायगर ग्रुप नवी मुंबई तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन; शिवसेनेचे जेष्ठ नेते सुरेश कुलकर्णी साहेबांची उपस्थिती
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
दि.२९/४/२०२२ रोजी तुर्भे स्टोअर येथे टायगर ग्रुप नवी मुंबई तर्फे मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान मास निमित्ताने तुर्भे स्टोअर विभाग, टायगर ग्रुप अध्यक्ष श्री. योगेश भाऊ कवडे व उपाध्यक्ष अली भाई खान यांच्या सौजन्याने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या इफ्तार पार्टीला प्रमुख म्हणून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी स्थायी समिती सभापती (न.मु.म.पा) मा. श्री. सूरेशजी कुलकर्णी साहेब उपस्थित होते.
तसेच यावेळी युवासेना उपविधानसभा अधिकारी (बेलापूर विधानसभा) श्री. महेश सुरेश कुलकर्णी साहेब व टायगर ग्रुप अध्यक्ष नवी मुंबई श्री. रमेश (भाऊ) पाटील, टायगर ग्रुप नवी मुंबई कार्याध्यक्ष श्री. महेशदादा डोंगरे, जिल्हा सरचिटणीस टायगर ग्रुप नवी मुंबई श्री. प्रशांत दादा यादव, शिवसेना विभागप्रमुख श्री. दिपेश शिंदे, समाजसेवक श्री. देविदास लगाडे, समाजसेवक श्री. कचरू वाघमारे आदी मान्यवर व शिवसैनिक पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
इफ्तार पार्टीला तुर्भे विभागांतील मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. यावेळी मुस्लीम बांधवांनी इफ्तार पार्टीच्या मेजवानीचा आस्वाद घेतला.