महाराष्ट्र

मरणाच्या दारात असणाऱ्या जन्मदात्या पित्याला दिले मुलीने जीवदान

उरण (दिनेश पवार) : आजकालच्या युगात जमिनीतून हिस्सा मागणाऱ्या मुली आपण नेहमीच बघत असतो, पण मरणाच्या दारात असणाऱ्या जन्मदात्या पित्याचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या मुली खूप कमी बघायला मिळतात. अशीच एक मुलगी चिरनेर गावातील अक्षता प्रशांत खारपाटील हिने आपल्या जन्मदात्या पित्याला मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी चक्क आपला लिव्हर देऊन जीवनदान देण्याचे काम केले. आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

सविस्तर वृत्त असे की रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती कै. काळूशेठ खारपाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रशांत काळूशेठ खारपाटील (वय ४५) यांना कोरोनाच्या संकटात लिव्हर सिराँसीन हा आजार जडला, त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे अशी माहिती नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना सहा महिन्यांपूर्वी दिली. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर खारपाटील कुटुंबियांचा आधारस्तंभ असणाऱ्या प्रशांत यांचे प्राण कोण वाचविणार अशा प्रश्न प्रशांत यांच्या कुटुंबियांसमोर आ वासून उभा राहिला.

आपला जन्मदाता पिता आता मरणार असा विचार करून प्रशांत खारपाटील यांची जेष्ठ कन्या अक्षता (गँबी) हिने आपला लिव्हर देण्याची इच्छा कुटुंबियांसमोर तसेच डॉक्टरांजवळ व्यक्त केली. यावेळी अक्षताचे मनोबल वाढवण्यासाठी व आपल्या सासऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी अक्षताचे पती पंकज प्रेमनाथ पाटील यांनी तू तूझ्या जन्मदात्या पित्याला बिनधास्त पणे तूझे लिव्हर दे मी तूझ्या मागे खंबीरपणे उभा आहे. असा विश्वास अक्षताला चक्क पतीने दिला. अक्षताने देवू केलेल्या लिव्हरमुळे मुंबई (परेल) येथील ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर रवि मोहंका व त्यांच्या पुर्ण टीमच्या बारा तासांच्या अथक प्रयत्नाने प्रशांत यांच्यावर नुकतीच यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली.

आज प्रशांत व त्यांची मूलगी अक्षता हे दोन्ही बाप लेक सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे अक्षता (गँबी) सारखी कन्या व पंकज सारखा जावई सर्वांना मिळावा अशी प्रार्थना मरणाच्या दारातून बाहेर आलेल्या प्रशांत ने महागणपती चरणी व्यक्त केली. तसेच कोरोनाच्या संकटात ही गेली एक वर्ष परिश्रम घेणारी त्यांची पत्नी आशा, दुसरी कन्या सुकन्या तीचे पती तेजस मारुती पाटील आणि चिरंजीव साईराज तसेच स्वतःचा जीव धोक्यात घालून लिव्हर देणाऱ्या अक्षता (गँबी) यांचा आदर्श प्रत्येकांनी घेऊन आप-आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा तिरस्कार न करता संकटात सापडलेल्या आपल्या आई वडिलांना सहकार्य करावे असे उदगार शेवटी पुनर्जन्म मिळालेल्या प्रशांत काळूशेठ खारपाटील यांनी व्यक्त केला आहे.

प्रशांत खारपाटील या रुग्णांला लिव्हर मिळाला नसता तर ते जगू शकले नसते त्या लिव्हर देण्याचे काम त्यांच्या मुलीने केले त्यामुळे अक्षता सारखी कन्या व पंकज सारखा जावई सर्वांना मिळावा अशी प्रतिक्रिया ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर रवि मोहंका यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button