नवी मुंबई

गोर-गरिबांचा देवदूत; जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

दिनांक ३१/१/२०२२ रोजी शिवसेना उपनेते, अध्यक्ष झोपडपट्टी सुधार समिती महाराष्ट्र राज्य मा. विजयजी नाहटा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, नवी मुंबई महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती सभापती मा. श्री. सुरेश कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात सर्व रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपनेते विजयजी नाहटा साहेब ह्यांनी सांगितले कि, “सुरेश कुलकर्णी साहेब हे आमचे जेष्ठ नेते आहेत अनुभवी आहेत. ते नेहमीच गोरगरीब लोकांची सेवा तसेच त्यांना मदत करत असतात. सर्व शिवसैनिक ‘भगवा सप्ताह’ च्या माध्यमातून गोरगरीब लोकांची सेवा करत आहेत. सिनियर सिटीझन कार्ड देणे असेल, श्रम कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर असेल तसेच क्रिकेट चे सामने भरविणे असेल. अशा प्रकारचे बहुसंख्य कार्यक्रम ‘भगवा सप्ताह’ मध्ये घेतले गेलेले आहेत व लोकांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभलेला आहे.”

तसेच आदरणीय विजयजी नाहटा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तुर्भेचे विभाग प्रमुख मा. विनोदजी मुके यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व गोर-गरीब गरजूंना ब्लॅंकेट, चादर चे वाटप करण्यात आले. यावेळी केक कापून नाहटा साहेबांना शुभेच्छा दिल्या गेल्या.

यावेळी सोबत नवी मुंबई महिला जिल्हा संघटक सौ. रंजनाताई शिंत्रे, शहरप्रमुख श्री. विजय माने, महिला आघाडी संपर्क प्रमुख सौ. सुरेखा गव्हाणे, विभाग प्रमुख विनोद मुके, तय्यब पटेल, उपविभाग प्रमुख अजय गुप्ता, शाखा प्रमुख लक्ष्मण मेदगे, प्रवीण पाटील व पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button