क्राइम

गरजु तसेच गरीब व्यक्तींना अन्न धान्य तसेच जेवणाचे वाटप

महाराष्ट्र शासनाकडून covid-19 चा पादुर्भाव रोखणेकामी ब्रेक द चेन करणेकामी लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधित काळात गरीब व गरजु लोकांना कडक निर्बंधांमुळे हाताला काम नसणाऱ्या गरजवंत लोकांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांचे नवी मुंबई पोलिसांकडून सातत्याने सेवाभावी संस्थांच्या मदतीने अन्नधान्याचे तसेच जेवणाची पाकिटे वाटप करण्यात येत आहेत.

वाशी पोलिस ठाणे: दिनांक १५.४.२०२१ रोजी वाशी गावाजवळील गरजू लोकांना दुपारी १२५ फूड पॅकेट चे वाटप करण्यात आले.

एपीएमसी पोलीस ठाणे: दिनांक १५.४.२०२१ रोजी दुपारी ग्रीन पॅलेस हॉटेलच्या पाठीमागील झोपडपट्टी परिसरात गरजू लोकांना दुपारी १२५ फूड पॅकेट चे वाटप करण्यात आले.

कोपरखैरणे पोलीस ठाणे: दिनांक १५.४.२०२१ रोजी बालाजी सिनेमागृह शेजारील झोपडपट्टी परिसरात गरजू लोकांना दुपारी १०० अन्नधान्याच्या गोण्यांचे वाटप 100 कुटुंबीयांना करण्यात आले.

रबाळे पोलीस ठाणे: दिनांक १०.४.२०२१ रोजी पोलीस स्टेशन जवळील झोपडपट्टी परिसरात शंभर अन्नधान्याच्या गोण्यांचे वाटप 100 कुटुंबीयांना करण्यात आले.

रबाले एमआयडीसी पोलीस ठाणे: दिनांक १५.४.२०२१ रोजी दुपारी पारधी पाडा हद्दीतील झोपडपट्टी परिसरात १२५ फूट पॉकेट चे वाटप करण्यात आले.

तुर्भे विभागातील पोलिस ठाण्यांकडुनहि असाच उपक्रम राबवण्यात येत आहे.

मागील वर्षातील लॉकडाउनच्या कालावधीमध्ये उपेक्षित, गोरगरीब मजूर, वंचित लोक तसेच इतर राज्यातील मजूरवर्ग त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सातत्याने प्रयत्नशील राहून खूप मेहनत घेतली होती. त्याचप्रमाणे सध्या कडक निर्बंध लादलेले असल्याकारणाने नियम मोडणार्‍या विरुद्ध कठोर कारवाई करीत असतानाच गोरगरीब लोकांच्या अन्य पाण्याची व्यवस्था करण्याकामी नवी मुंबई पोलीस समर्थपणे काम करीत आहेत. वरील उपक्रम हा मा पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ १ श्री सुरेश मेंगडे व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो श्री विनायक आ. वस्त, श्री भरत गाडे यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडल मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात येत आहे. यापुढे अशा प्रकारे उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील आहोत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button