ठाणे जिल्हा वकील संघटनेची ५ मार्चला निवडणूक जाहीर
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
ठाणे: दर २ वर्षांनी होणारी यंदा कोरोना मुळे लांबणीवर पडलेली ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणुक ५ मार्च २०२२ रोजी होणार अशी घोषणा होऊन उमेदवार प्रचार प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणुकीत अध्यक्षांसह ते सदस्यपद या २३ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुक ५ मार्च २०२२ या एकाच दिवशी पार पडणार आहे. निवडणुकीत एकूण १३५० वकील मतदार आहेत. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे मतदान बार रूम कोर्ट नाका ठाणे येथे शनिवार ५ मार्च २०२२ रोजी वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत तर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी, निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अध्यक्ष पदासाठी कदम प्रशांत गणपत, पाटील मधुकर आत्माराम. उपाध्यक्ष पदासाठी देशमुख हेमलता अविनाश, पवार सुधाकर भाऊलाल, सिंह सुभाषचंद्र नागेश्वर. सचिव पदासाठी गुप्ते नरेंद्र चंद्रकांत, हाडवले भाऊ जंकू, लसने सुनिल एकनाथ. खजिनदार पदासाठी जोशी अनिल दामोदर, वाजगे विजय. सहसचिव पदासाठी देवरे शांताराम भास्करराव, म्हात्रे हेमंत दिगंबर. जॉइंट सेक्रेटरी लेडीज पदासाठी कासार स्नेहल गणेश, म्हात्रे रुपाली विठोबा. समिती सदस्य पद बंद्रे सरीता नामदेव, जोशी विकास शंकर, पांडे संतोष कुमार, पवार अनिल लक्ष्मण, पुजारी गणेश अप्पाजी, शेजवाल उपेक्षा पंडित, शिंदे रुपाली रोहित, तारमळे राजाराम शंकर, सायली वलामे हे २३ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत
निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून. ॲड. मुनीर अहमद काम पाहणार आहेत. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय.