“टेक्नोलॉजी” पुरस्काराने नवी मुंबई को-ऑप बँकेचा गौरव
बँकींग क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान ग्राहकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्राहकांकरिता कोअर बँकींग प्रणाली, एस.एम.एस. सुविधा, आर.टी.जी.एस. / एन.ई.एफ.टी, ई-टॅक्स पेमेंट, रूपे कम डेबीट कार्ड, ए.टी.एम. सुविधा, आय.एम.पी.एस तसेच यु.पी.आय. या सारख्या तांत्रिक आधुनिक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून नवी मुंबई को-ऑप बँक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
नवी मुंबई को-ऑप बँकेने ग्राहकांच्या सेवेत आणलेल्या अत्याधुनिक सुविधांच्या कार्यपणालीची दखल घेवून अविज पब्लिकेशन, कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “बैंको” यांचेकडून राष्ट्रीय पातळीवर नागरी बँक विभागात “टेक्नॉलाजी” पुरस्काराने नवी मुंबई को-ऑप बँकेला गौरविण्यात आले.
दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी म्हैसुर, कर्नाटक येथे संपन्न झालेल्या बँको व्ल्यु रिवीन सोहाळयात बँकेच्या वतीने अध्यक्ष डॉ. विजय कदम, मा. उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ गोसावी व इतर सर्व मा. संचालक श्री. श्यामराव महाडिक, सीए. वी.आर. सावंत, श्री. लक्ष्मण गटकळ, श्री. सुभाष चव्हाण यांनी हा पुरस्काररूपी चषक स्विकारला.
हा गौरव बँकेच्या संचालक मंडळ, कर्मचारी, ठेव प्रतिनिधीच्या मेहनतीचा व सर्व खातेदार, सभासदांच्या सहकार्याचा आहे. या पुरस्काराने जनमानसात नवी मुंबई को-ऑप बँकेची प्रतिमा वाढली आहे तसेच या पुरस्काराने बँकेच्या ग्राहकवर्गात उत्साहाचे वातावरण आहे.