तळवडे गावच्या आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाला सुरुवात:
तळवडे गावच्या आरोग्य उपकेंद्रात कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात, नागरिकांनी मानले आभार
राजापूर प्रतिनिधी:
नागरिकांना कोव्हीड लस घेण्यासाठी कित्येक दिवस वाट बघत बसावी लागत आहे तसेच कोव्हीड सेंटरवर सकाळी लवकर जाऊन कित्येक तास रांगेत उभे रहावे लागत आहे. तसेच कोव्हीड सेंटरवर जाण्यासाठी वाहन पण उपलब्ध होत नाही. अशावेळी तळवडे गावच्या आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाला सुरुवात झाली असल्याने स्थानिक नागरिकांना लस घेण्यासाठी होणारा आटापिटा कमी होईल. त्यामुळे स्थानिक नागरीकांनी आभार मानले.
उद्घाटन प्रसंगी डॉक्टर पाध्ये मॅडम, आरोग्य सहाय्यक टी बी पाटील, गावचे प्रथम नागरिक माननीय सरपंच प्रभूदेसाई साहेब, तळवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते माननीय आप्पा साळवी साहेब, पाचल गावचे प्रमुख नागरिक माननीय मासिये मॅडम, तळवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार गुडेकर साहेब, करकचे सरपंच सुरेश ऐनारकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र करक कारवली येथील आरोग्य कर्मचारी, स्टाफ उपस्थित होते.