स्वच्छ नवी मुंबई अभियान मध्ये युगनिर्माते प्रतिष्ठान चा खारीचा वाटा
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
दि. १३ फेब्रुवारी रोजी युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले बेलापुर वर स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
राज्याचे सारं हे दुर्ग आणि याच दुर्गांचे संवर्धन करण्याचे कर्तव्य हे प्रत्येक नागरिकांचे आहे, हे या मोहिमेतून निदर्शनास आले. युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीने नवी मुंबईतील एकमेव किल्ला किल्ले बेलापूर या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत ७० ते ८० NSS स्वंयसेवक, न.मुं.म.पा. अधिकारी, स्वच्छता दुत, मित्रपरिवार उपस्थित होते. मोहिमेकरिता विशेष सहभाग हा सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खारघर येथील NSS स्वंयसेवकांचा होता.
यावेळी अध्यक्ष शंकर वसमाने यांनी सर्व उपस्थितांना माझी वसुंधरेची शपथ दिली. दरम्यान किल्ले बेलापूर यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करेपर्यंत युगनिर्माते प्रतिष्ठान किल्ल्याच्या संवर्धनाकरिता काम करत राहील, असे देखील अध्यक्ष शंकर वसमाने यांनी ग्वाही दिली.
सदर प्रसंगी स्वच्छता अधिकारी, न.मुं.म.पा. श्री. मिलिंद तांडेल, समाजसेविका सौ. दर्शना भोईर, समाजसेविका सरिता खैरवासया, गोवर्धनी माता सेवा मंडळ अध्यक्ष मनोज बालम, बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्ष पल्लवी निंबाळकर आदी उपस्थित होते.
त्याचसोबत युगनिर्माते प्रतिष्ठान उपाध्यक्ष अक्षय चव्हाण, खजिनदार सुदर्शन कौदरे, सदस्य विशाल पिंगळे, सदस्य बसवराज नंदी, सदस्य प्रशांत शेलार, सदस्य कोमल शेलार आदी पदाधिकारी / सदस्य उपस्थित होते.