सुरतेच्या लुटीचा अवाक करणारा ‘शोध’ घेण्यासाठी अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री केतकी थत्ते स्टोरीटेलवर!
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य…उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम…बुध्दिमत्ता, कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला हा रोमांचक अद्भुत थरार… मुरलीधर खैरनार लिखित ‘शोध’ या विलक्षण लोकप्रिय ठरलेल्या कादंबरीतून आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री केतकी थत्ते यांच्या जबरदस्त दमदार आवाजात स्टोरीटेल मराठी खास इतिहास-साहित्यप्रेमींसाठी घेऊन येत आहे.
ही गोष्ट सुरू होते १६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला! कुठे गडप झाला हा खजिना? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात? ही एक घटना आणि तो परत मिळविण्यासाठी वर्तमान काळातील दोन प्रकृतींमधला संघर्ष. हा खजिना कुठे आहे हे सांगणारा निरोप महाराजांना देणारा गोंदाजी. मुघलांच्या ताब्यात सापडल्यानंतर त्याचा झालेला गूढ मृत्यू. खजिन्याच्या शोधाविषयी सारे संभ्रमित असणे. खजिना शोधण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर, खलिता मिळवणं, त्यातील सांकेतिक भाषेचा वेध, यात दोन्ही गटाचं द्वंद्व. खजिन्याच्या माहितीसाठी आसुसलेले इतिहासप्रेमी आणि संपत्ती मिळविण्यासाठी हव्यास असलेल्या काही शक्ती… असं हे कथानक स्टोरीटेलवर ऐकताना रसिकाला शोधयात्रेचा, रहस्यमयतेचा दमदार अनुभव देतं. गुंतवून टाकणाऱ्या इतिहास, वर्तमान, मानवी वृत्ती-प्रवृत्ती, आधुनिक माहिती तंत्रज्ञान सामाजिक-राजकीय परिस्थिती यांची सांगड प्रभावीपणे घालत कमालीचे कुतूहल तयार करते.
अभिनेता उपेंद्र लिमये या कादंबरी विषयी बोलताना म्हणाले, “किशोर कदम, सचिन खेडेकर, सयाजी शिंदे असे काही माझे समविचारी मित्र जेव्हा आम्ही एखादं नवं काही ऐकतात, वाचतात तेव्हा लगेच एकमेकांना सांगतो, सुचवतो. त्या संदर्भानुसार मी ही मुरलीधर खैरनारांची अफलातून कादंबरी वाचली. सलग दीड दोन दिवसात मी ती पूर्ण केली, तिने मला झपाटून टाकल. अश्या काही मोजक्या कादंबऱ्या असतात त्यातलीच ही एक खूप दुर्मिळ कादंबरी आहे, जी तुमची झोप उडवते आणि तुम्हाला गुंतवून ठेवते. अतिशय सकस कथाबीज आणि सुबक मांडणीमुळे स्टोरीटेलवर ऑडिओ रूपात सादर करताना जसा मी भारावून गेलो तसंच तुम्ही ऐकताना गुंतून जाणार हे नक्की”. तर अभिनेत्री केतकी थत्ते म्हणाल्या “मीही ही कादंबरी अहोरात्र सलग तीन दिवसात वाचून काढली. एकदा हातात धरली कि संपल्याशिवाय चैन पडत नाही. आपण तहान भूक सगळं हरपून कादंबरीत गुंतून जातो. लेखक मुरलीधर खैरनार यांच्या लेखणीची ही किमया आहे. या शोधाच्या मोहिमेतील आपणही एक होतो आणि त्यातील पात्रांसोबत वावरू लागतो. स्टोरीटेल कादंबऱ्यांची निवड युनिव्हर्सल विचार करून करते. सर्वांनी नक्की ऐकावी अशी अप्रतिम कलाकृती”
शिवाजीमहाराजांच्या गोष्टी वाचायला महाराष्ट्रात साऱ्यांनाच आवडतात. त्यात या कादंबरीतली गोष्ट फारशी कुणाला माहीत नसलेली आहे. दुसरं म्हणजे जगभर लोकप्रिय असलेल्या थ्रिलर्सप्रमाणे केलेली कथानकाची मांडणी, हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. त्या प्रवाहात माणूस एकदा अडकला की, तो लवकर सुटत नाही. अस्सल मराठी वातावरण, भूगोल-इतिहासाचे नेमके तपशील, आदिवासींचे सण-उत्सव, त्यांच्या वाद्यांचे नाद, पालखी-सोहळे गडकिल्ले, अनोळखी चालीरीती यांची सहज प्रचीती येते. व्यापक विषयांचा सोप्या भाषेत धांडोळा घेणं, हे कादंबरीचं शक्तिस्थळ आहे. जगण्याच्या सर्व शक्याशक्यतांचा कोलाज यात आहे.
खजिन्याचा शोध घेणारी थरारक कथा लेखकाने आपल्या भावविश्वातून उभी केली आहे.. कथा रंगवताना शिवकालीन अस्सल नोंदी, दस्तावेज याचा पुरेपूर उपयोग लेखकाने भौगोलिक भान ठेवून केला आहे.. मुंबई, नाशिक आणि सप्तश्रृंग पर्वतरांगेतील ठिकाणे लेखक आपल्या लेखणीने वाचकांसमोर जिवंत करतो.. कथेची उत्कृष्ठ मांडणी, वेगवान कथानक, लेखणीतून जिवंत केलेले प्रसंग, श्वास रोखून धरायला लावणारा सस्पेन्स अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री केतकी थत्ते यांचा जबरदस्त दमदार श्राव्यभिनायाने नटलेली तुफान लोकप्रिय ‘शोध’ची उत्कंठा स्टोरीटेल मराठीवर ऐकता येईल.
मुरलीधर खैरनार लिखित ‘शोध’ऐकण्यासाठी खालील लिंक पहा..
https://www.storytel.com/in/en/authors/590328-Murlidhar-Khairnar
मीडियासाठी व्हिडीओ बाइट्स Wetransfer लिंक
Download link
https://wetransfer.com/downloads/5109d7d0ccab4968a32b2b746ffc361520220407042040/e815ac59bb917ed0d34ee457b3c8c6c820220407042058/933101