महाराष्ट्र

“सूरताल कराओके सिंगींग क्लब”तर्फे गरजू व वंचित गटातील महिलांना वस्तूंच वाटप!

लॉकडाऊनची झळ समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना बसत आहे. पहिल्या लाटेनंतर सावरत असताना दुसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाल्यामुळे परत कडक लॉकडाऊन करावा लागल्यामुळे समाजातील सर्व स्तरावरील आर्थिक स्थिती पुन्हा कोलमडली आहे. याची झळ देहविक्रय करणाऱ्या महिलांना सुद्धा बसली आहे. याची झळ देहविक्रय करणाऱ्या महिलांना सुद्धा बसली आहे. १५ एप्रिल रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या सेक्स वर्कर्सचं आयुष्य उद्धवस्त होऊन गेलं. त्यांना आता जगणं कठीण होऊन बसलं आहे. त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. यांच्यापैकी बहुतेकजणी स्थलांतरित आहेत. स्वत:ची ओळख पटवून देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे दस्तावेजही नाहीत.

समाजातील अश्या वंचित व दुर्लक्षित महिलांसाठी विले पार्ले पूर्व येथील “सूर ताल कराओके सिंगींग क्लब”तर्फे सौ. अमृता देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील गरजू, गरीब व वंचित गटातील महिलांना काल शनिवारी गरजेच्या वस्तूंच वाटप करून मदत करण्यात आली. सूरताल क्लब मधील सर्व गायकांचे सहकार्य ह्या उपक्रमास लाभले होते.

फॉकलंड रोड (पठ्ठे बापूराव मार्ग ) तसेच गिरगावातील कांदेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाशेजारी देहविक्री करणाऱ्या महिलांची वसाहत आहे. त्यांच्या करिता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप श्रीमती अमृता देवधर, सुरताल ग्रुप, विलेपार्ले पूर्व, यांच्या वतीने करण्यात आले. १०० महिलांसाठी अत्यावश्यक वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले होते.

अजून कोरोनाचा धोका पूर्णतः टळलेला नाही. सर्वत्र अस्थिरता असल्याने पुढेही मुंबईतील अनेक गरजूंना, त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार असल्याचा मानस श्रीमती अमृता देवधर यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात ४० गरजू महिलांना आम्ही मदत देणार आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button