महाराष्ट्र
समीर गांधी ह्यांच्या भालचंद्र मोबाईल शोरूमला काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड ह्यांची सदिच्छा भेट
आज लांजा दौऱ्यावर असणारे काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी समीर गांधी यांच्या भालचंद्र मोबाईल शोरूमला सदिच्छा भेट दिली. तसेच लांजा शहरामध्ये अशा प्रकारचे मोबाईलचे अद्ययावत शोरूम पाहून अविनाश लाड यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी अविनाश लाड ह्यांनी समीरला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई वार्ताशी बोलताना भालचंद्र मोबाईल शोरूमचे मालक समीर गांधी हयांनी सांगितले, “भालचंद्र मोबाईल शोरूमच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून दिली जाईल. ग्राहकांना मोबाईल बद्दलच्या तक्रारी किंवा चांगली सेवा मिळू शकेल जेणेकरून भालचंद्र मोबाईल शोरूम ग्राहकांच्या एक नंबर पसंतीचे शोरूम असेल.”