मनोरंजन

‘स्टोरीटेल’ वर ऐका आता ‘सायको किलर’ चा थरार

निरंजन मेढेकर लिखित अभिनेता नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजातली स्टोरीटेलची नवी क्राईम सिरीज

तो येतोय…संध्याकाळी दारावर कुणाची अनोळखी थाप पडली तर लगेच दार उघडू नका! नव्वदच्या दशकातल्या शांत पुण्यात एकामागोमाग एक खुनांचं-हत्याकांडांचं गूढ सत्र सुरू झालंय. पोलिसांना या विचित्र गुन्ह्यांचा तपास काही केल्या लागत नाहीये. दुसरीकडे बातमीच्या नादात क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वे या सगळ्या घटनाक्रमांत त्याच्याही नकळत गुंतत चाललाय. या चक्रव्युहात एकदा फसलं की जिवंत बाहेर पडणं अशक्य आहे! पण हे त्याला तरी कुठं माहितीय? एका बातमीवरून सुरू झालेला हा विचित्र प्रवास निलेशचा शेवटचा श्वास घेऊनच संपेल?

‘स्टोरीटेल’वर गुरूवारी २३ सप्टेंबरला रिलीज झालेल्या ‘सायको किलर’ या क्राईम सिरीजचं हे उत्कंठावर्धक कथानक! निरंजन मेढेकर लिखित आणि अभिनेता नचिकेत देवस्थळी याच्या दमदार आवाजातल्या ‘सायको किलर’ला पहिल्या दिवसापासूनच श्रोत्यांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शहरात एकामागोमाग एक घडणाऱ्या हत्याकांडांभोवती आणि प्रसंगी जीव धोक्यात घालून पोलिसांना तपासात मदत करणाऱ्या तरुण बातमीदाराभोवती या सिरीजची स्टोरीलाईन गुंफलेली आहे. ‘सायको किलर’च्या मानसिकतेचा अभ्यास करत पोलिस अखेर त्याच्यापर्यंत पोचतात का, शहरात एकामागोमाग एक सुरू असलेली हत्याकांड थांबतात का, प्रसंगी या कादंबरीच्या नायकाला क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेला आपल्या प्राणांची बाजी लावायला लागते का या प्रश्नांची उत्तंर मिळवण्यासाठी सायको किलर ऐकायलाच हवी! या सिरीजचं कथानक पुण्यात घडलेल्या सगळ्यात मोठ्या हत्याकांडावरून प्रेरित आहे.

निरंजन मेढेकर यांनी याआधी वेगवेगळ्या मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये बातमीदारी केलेली असल्यानं बातमीदार-पत्रकारांचा संघर्ष त्यांना परिचित आहे. त्यामुळं या सिरीजमध्ये मराठी पत्रकारितेचं आणि बातमीदारांच्या भावविश्वाचं वास्तवदर्शी चित्रण झालंय. याआधी निरंजन मेढेकर यांनी ‘सीरियल किलर’ आणि ‘विनाशकाले’ या दोन क्राईम सिरीज ‘स्टोरीटेल’साठी लिहिल्या असून त्यालाही श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ‘व्हायरस पुणे’ ही त्यांनी भावानुवाद केलेली ही सायफाय थ्रिलर सिरीज मुक्ता बर्वे यांच्या आवाजात प्रसिद्ध असून, ती श्रोत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

‘सुखन’, ‘महानिर्वाण’ या नाटकांमुळे तर सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या ‘ती सध्या परत येतीय’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेमुळे चर्चेत असलेले अभिनेते नचिकेत देवस्थळी यांचा भारदस्त आवाज ‘सायको किलर’ला लाभलाय. या सिरीजमध्ये पत्रकार, पोलीस इन्स्पेक्टर, गुन्हेगार, मनोविकारतज्ज्ञ अशी वेगवेगळी पात्रं असली तरी नचिकेतनं आपल्या दमदार आवाजानं आणि उत्तम व्हॉईस मॉड्युलेशननं ही सगळी पात्र अक्षऱशः जिवंत केली आहेत. त्यामुळं नचिकेत देवस्थळी यांच्या भारदस्त आवाजात ‘सायको किलर’मधला थरार अनुभवणं ही श्रोत्यांसाठी खरंच मेजवानी ठरतीय.

‘सायको किलर’ या क्राईम सिरीजचं उत्कंठावर्धक कथानक ऐक्यासाठी आपल्याला स्टोरीटेल मराठी डाऊनलोड करावं लागेल. स्टोरीटेल इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, गुजराती आणि कन्नड या ११ भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक आणि ईबुक्स प्रकाशित करते. मराठीतील हजारो सर्वोत्तम पुस्तके कुठेही कधीही ऐकण्यासाठी आपल्याला स्टोरीटेल ‘गुगल प्ले स्टोअर’ http://bit.ly/2rriZaU आणि ‘iOS अॅप स्टोअर’ https://apple.co/2zUcGkG दोन्हीवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी https://www.storytel.com या वेबसाईटला भेट द्या….

प्रोमो डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक पहा
https://www.facebook.com/storytelmarathi/videos/450569419549496

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button