महाराष्ट्र
मातीचे पारंपारिक नाग उरण बाजारपेठेत दाखल
उरण (दिनेश पवार) : नागपंचमी रविवारी असल्याने उरण बाजार पेठेत पारंपारिक मातीचे नाग दाखल झाल्याने नागरिक नाग खरेदी करताना सर्वत्र दिसतात. उरण बाजार पेठेत महाराष्ट्र स्वीट जवळ, गांधी चौक, राजपाल नाका, तसेच उरण बाजारपेठेत ठिक-ठिकाणी रंगीत-पिवळे मातीचे नाग विकायला आले आहेत.
नागपंचमी दिवशी पारंपारिक मातीच्या नागाची पूजा महिलावर्ग करतात. पूजेसाठी लागणारी पुजेची सामुग्री खरेदी करताना महिला वर्ग बाजारपेठेत मोठया प्रमाणावर दिसतात. गेली ३० वर्षापासून आम्ही मातीचे नाग बनवितो त्यावर आकर्षक रंगकाम करतो, ते उरण बाजारपेठेत विकायला आणतो. लहान मातीचे नग २० रुपये एक, मोठे ३०, ४० व ५० या दराने आम्ही विकतो. असे उरण तालुक्यातील मुळेखंड येथील सौ. सुरेखा कुंभार यांनी सांगितले.