नवी मुंबई
सामाजिक कार्यकर्ते आकाश जगताप ठरलेत गरजूंचे देवदूत
नवी मुंबई: सामाजिक कार्यकर्ते आकाश जगताप ह्यांनी कोपरखैरणे येथे सामाजिक आपुलकी जपत वस्त्रदान केले. रस्त्यावरील लहान गरजू मुले ज्यांचे खेळण्याचे वय आहे पण त्यांना आता महामारीला सामोरे जावे लागत आहे तसेच त्यात वाढलेले पाऊसाचे पाणी ह्या सर्वात माणुसकीच्या नात्याने आकाश जगताप ह्यांच्या हातून एक प्रामाणिक सामाजिक कार्य करण्यात आले.
त्यांनी गोर-गरीब रस्त्यावरील गरजुंना लहान मुलांना अंथरूण व कपडे तसेच बायकांना साडी वाटप केले.
नवी मुंबई वार्ताशी बोलताना आकाश जगताप म्हणाले, “पाऊस जोरात चालू आहे अशामध्ये रस्त्यावरील गरजू लोकांना एक छोटीशी मदत, मुख्यतः लहान मुलांसाठी अंथरूण व कपडे जेणेकरून त्यांना थंडीला सामोरे जावे लागू नये.”