सामाजिक कार्यकर्ते विजय वाळुंज व अजय वाळुंज ह्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न; माननीय लोकनेते गणेशजी नाईक ह्यांची प्रमुख उपस्थिती
दिनांक २२ ऑक्टोबर रोजी अजय वाळुंज व दिनांक २७ ऑक्टोबर रोजी विजय वाळुंज ह्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळाली. प्रत्येक नगरसेवक असेल वा कार्यकर्ता; तो आपल्या चांगल्या कामाने जनमानसामध्ये आपली प्रतिमा उंचावतो. सामाजिक कार्यकर्ते विजय वाळुंज ह्यांना पण लोक “मै नहीं मेरा काम बोलेगा” अशी उपमा लागून ओळखले जात आहे. दोन्ही बंधूंच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २२ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर पर्यंत भरगच्च कार्यक्रम पार पडला. स्थानिक नागरिकांनी त्याचा मोठया प्रमाणावर फायदा घेतला.
दिनांक २२ व २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ मध्ये मोफत लसीकरण प्रमाणपत्र शिबीर घेण्यात आले तसेच मोफत कोव्हीड – १९ यूनिवर्सल पास नोंदणी शिबीर घेण्यात आले. दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ मध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार संजीवजी नाईक साहेब उपस्थित होते. सायंकाळी 6 वाजता क्रातिसिंह नाना पाटील उद्यानात सेक्टर १५ येथे स्पीकर साऊंड सिस्टीमचा लोकार्पण सोहळा पार पडला. दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ मध्ये मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता माँ साहेब मीनाताई ठाकरे मैदानात सेक्टर १५/१६ येथे नवीन विद्युत दिव्यांचे LED पोल लावणे तसेच संत ज्ञानेश्वर उद्यान सेक्टर १५/१६ येथे स्पीकर साउंड सिस्टीमचा लोकार्पण सोहळा पार पडला. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या शुभहस्ते मोफत मास्क वाटप, मोफत यूनिवर्सल ई-पास चे वाटप तसेच सेना, काँग्रेसमधील युवक-कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश असा भरगच्च कार्यक्रम पार पडला.
नवी मुंबई वार्ता बोलताना विजय वाळुंज ह्यांनी सांगितले कि, “माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी व माझी पत्नी सौ. अर्चना सोबत सकाळीच श्री. सिद्धीविनायकाच्या चरणी जाऊन फक्त माझ्या एकट्यासाठी नव्हे तर माझ्यावर प्रेम करणार्या जनतेसाठी आणि मित्र परिवारासाठीसुद्धा नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतले. इतर अवास्तव खर्च करण्यापेक्षा विविध सामाजिक कार्यक्रम घेण्याचे आमचे ठरले. नियोजीत कार्यक्रमानुसार मोफत युनिवर्सल ई पास बनविणे, वॉक्सिनेशन सर्टिफिकेट बनवणे, मोफत आरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबीर अशा लोकोपयोगी कार्यक्रमांचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला. आम्हा दोघा बंधूंचा वाढदिवस समाजाच्या कामी आला यामुळे मनाला समाधान लाभले. ज्या व्यक्तीमत्वावर प्रेम करून राजकारणात समाजकारणात प्रवेश केला ते माननीय गणेशजी नाईक म्हणजेच आमचे दादा यांनी माझ्यावरील प्रेम आपल्या शब्दांमधून व्यक्त केले तसेच पुढील वाटचालीस मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या, खरोखरच भावनिक क्षण होता. या शुभ प्रसंगी माननीय नगरसेवक व माझे मार्गदर्शक व माजी विरोधीपक्ष नेते श्री. दशरथजी भगत आमचे नाना माझे सहकारी नगरसेवक श्री. प्रकाशभाऊ मोरे तसेच जेष्ठ नगरसेवक श्री. संपतजी शेवाळे व शशिकांतजी राऊत साहेब, माजी नगरसेवक श्रीमती अंजली वाळुंज, विभागातील जेष्ठ, श्रेष्ठ पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते त्याप्रमाणे विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने माझ्या प्रेमापोटी वाढदिवसानिमित्त लावलेली हजेरी पाहून मन गहिवरून आले . सर्वात महत्वाचे म्हणजे गेली सात दिवस सतत या जनसेवेच्या कार्यक्रमात दिवसरात्र काम करणारे मित्र व कार्यकर्ते यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. अशीच साथ आणि असेच प्रेम सतत लाभत राहो कारण हिच उर्जा मला जनसेवा करण्यासाठी प्रेरणा देत राहील. मी पैसे कमवले नसतील पण तुमच्यासारखी माणसे कमवली यासाठी खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो.”