नवी मुंबई

शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था महिला मंडळ आयोजित मंगळागौर कार्यक्रम:

शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था महिला मंडळ यांच्या वतीने शनिवार दि. ४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४.३० ते ७.०० या वेळेत मंगळागौर आयोजीत करण्यात आली. यावेळी नेरूळ येथील पोलीस उपनिरिक्षक वर्षा काळे मॅडम यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थीती लाभली.

आपले पारंपरिक सण, उत्सव यांची मज्जा आणि उत्साह जपण्यासाठी आणि महिलांना एकत्रीत करून नव्या संकल्पनांसह कार्यक्रम साजरे करण्यासाठी शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेचे महिला मंडळ नेहमीच कार्यरत असते. याचाच एक भाग म्हणून मंगळागौर साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेतील महिलांनी उत्फूर्तपणे सहभाग दर्शवला. तसेच इतर महिला मंडळातील महिलांनीही उपस्थिती लावली. पोलीस उपनिरिक्षक वर्षा काळे मॅडम यांनी शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेच्या कामाचे कौतुक केले आणि यापुढेही संस्थेच्या माध्यमातून सणउत्सवांची परंपरा अशीच पद्धतीने जपली जावी असेही त्या म्हणाल्या. तसेच वर्षा भोसले यांच्या सकारात्मक व्यक्तिमत्त्वाविषयी आदर व्यक्त केला.

शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेच्या सदस्य असलेल्या रेखा तांबे वाघ यांच्या Ideal Play Abacus फ्रँचायझीला राष्ट्रिय पातळीवर ऍबॅकस स्पर्धा २०२१ मध्ये दुसरा क्रमांक प्राप्त झाला. तसेच रेखा तांबे वाघ यांचे विद्यार्थी अर्णव तांबेवाघ – ४ था क्रमांक, श्रेयश सरगर – ४ था क्रमांक, आयुष दातखिळे – ४ था क्रमांक, माधव कमाले – ५ वा क्रमांक, जितेश पिंपळे – ५ वा क्रमांक असे घवघवीत यश प्राप्त झाले. म्हणून या कर्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस सहनिरीक्षक वर्षा काळे मॅडम आणि शिवसह्याद्री संस्थेच्या कार्याध्यक्ष प्रा. वर्षा भोसले आणि उपखजिंदार प्रभा पाटील, उपाध्यक्षा फुलंन शिंदे यांच्या हस्ते रेखा तांबे – वाघ यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या इतरही महिला सदस्या कार्यक्रमास उपस्थिती होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button