नवी मुंबई
शिवसेना नवी मुंबई आणि विजय नाहाटा फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
विभागप्रमुख मा. श्री. दर्शन भणगे साहेबांनी आज दिनांक ११/०४/२०२१ रोजी शिवसेना नवी मुंबई आणि विजय नाहाटा फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे रक्तपेढी, नवी मुंबई महानगरपालिकासाठी ६३ बॉटल्स जमा करण्यात आल्या.
सदर प्रसंगी खासदार मा. श्री. राजनजी विचारे साहेब, शिवसेना उपनेते मा. श्री. विजयजी नाहाटा साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. विठ्ठलजी मोरे साहेब, शाखा प्रमुख राकेश मोरे, उपशहर प्रमुख सौ. प्रणाली कदम, माजी नगरसेवक श्री. मनोहर जोशी, उपशाखा प्रमुख अश्विनी शिंदे आणि महिला उपविभागसंघटक सौ. काजल भणगे उपस्थित होते.