शिवसेनेने दिले नवी मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला पाच व्हेंटिलेटर
वाढत्या किरोनाच्या प्रादूर्भावाला रोखण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील रुग्णांना व्हेंटिलेटरची कमतरता भासू नये व त्यामुळे रुग्णांची गैरसीय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे यांच्या वतीने नवी मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला पाच व्हेंटिलेटर देण्यात आले.
आज शिवसेना उपनेते, पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती (राज्य मंत्री दर्जा ) विजय नाहटा, शिवसेनेचे खासदार राजन विचारे, बेलापूर विधान सभेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्या हस्ते नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले.
यावेळी नवी मुंबईतील नागरी समस्या सोडवण्या संदर्भात चर्चा करून पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.यावेळी पावसाळी कामांना गती देण्यात यावी, संभाव्य लहान मुलांसाठी येणारी कोरोनाची लाट थोपवण्यासाठी कोरोना सेंटर उभारण्यात यावेत, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली म्हणून आहेत ते कोरोना सेंटर बंद नकर्ता सुरूच ठेवण्यात यावेत, झोपडपट्टी वीभागात औषध फवारणी करण्यात येऊन मलेरिया, डेंगी, हिवतापाची साथ पसरू नये म्हणून उपाय योजना करण्यात याव्यात, पावसाळी गटारे साफ सफाई करण्यात यावेत अशा मागण्याचे निवेदन विजय नाहटा यांच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले.
खासदार राजन विचारे यांनी मागील काही प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या संदर्भात आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव, दिलीप घोडेकर, शिवराम पाटील, रोहिदास पाटील, संतोष घोसाळकर, नवी मुंबई जिल्हा महिला संघटक रंजनाताई शिंत्रे शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, विजय माने तसेच शिवसेनेचे माजी नगर सेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.