शिवसहयाद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने विविध वाचनालयास ग्रंथ भेट देऊन वाचक दिवस साजरा.
१९ जून हा दिवस महाराष्ट्र सरकारने वाचक दिवस जाहीर केला आणि संस्थेने या दिवसाचे औचित्य साधून कवी कुसुमाग्रज वाचनालय, सिवुड, श्री ज्योतिर्लिंग वाचनालय निनाम पाडळी, नेहरू वाचनालय मायणी ता. खटाव, जि. सातारा, आस्था सामजिक संस्था ऐरोली. या संस्थांना प्रत्येकी २५१ पुस्तकें भेट स्वरूपात देण्यात आली.
नीलांबरी गाणू यांच्या घरातील ही दुर्मिळ पुस्तके शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामजिक संस्थेने विकत घेतली आणि विविध वाचनालयाना भेट दिली. मागील काही काळापासून लोक कोरोना महामारीने त्रस्त आहेत. माणसे माणसाना भेटणे दुर्मिळ झालंय पण पुस्तकें तुम्हाला कधीच एकटे टाकत नाहीत गरज आहे तूम्ही एक पावूल पुस्तकांच्या दिशेने जाण्याची.
पुस्तकं भेटीला उत्तर देताना कुसुमाग्रज वाचनालयाचे श्री. जयवंत पाटील यांनी संस्थेचे कौतुक केले ऐक्यवर्धक या नावाप्रमाणे संस्था ऐक्य जपण्याचे प्रयत्न करीत असल्याचे मत व्यक्त केले. वेदांत जनसेवा ट्रस्टचे श्री. सुनील कुईगडे यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केलें. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधाकर पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना संस्थेची पार्श्वभूमी आणि विविध उपक्रम याविषयीं माहिती सांगितली. संस्थेच्या कार्याध्यक्ष प्रा. वर्षा भोसले यांनी या कार्याला हातभार लावलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करत, ज्येष्ठ गझलकार अप्पा ठाकूर या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी पाठवलेल्या शब्दरूपी शुभेच्छा वाचून दाखवल्या.
संस्थेचे पदाधिकारी सचिन कदम यांनी या कार्यक्रमासाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करीत अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला नवी मुंबईचे भूषण श्री. ललित पाठक, प्रवीण पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी अण्णा साहेब निकम, कालिदास इंगवले, रवींद्र महाडिक, रत्नाकर कुदळे प्रभा पाटील, फुलंन शिंदे, मनीषा वाघ, रेखा तांबे वाघ, राजेश घाडगे यांनी निवेदन केले.