श्रीराम दरबार मुर्ती आगमन मिरवणुक सोहळ्यानिमित्त; शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन प्रकाश कदम ह्यांची उपस्थिती
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
रविवार दिनांक १४ मे रोजी जय श्रीराम हनुमान सेवा मंडळ (मधलीवाडी, ता.चिपळूण, जि. रत्नागिरी) आयोजित होणाऱ्या भव्य श्रीराम मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्यानिमित्त आज श्रीराम दरबार मुर्ती आगमन मिरवणुक सोहळ्यानिमित्त शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन प्रकाश कदम हे उपस्थिती होते.
भगवान श्री परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ग्रामदेवता श्रीबाजीबाबा आणि श्रीकालीश्री यांच्या आशिर्वादाने कोकणातील चिपळूण तालुक्यातील कालुस्ते मधलीवाडी या ठिकाणी श्रीराम मंदिर व्हावे हि संकल्पना भाविक भक्तांच्या मनात आली आणि त्यासाठी ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांनी एकत्रित काम करून आज हि वास्तु उभी राहिलेली आहे.
दिनांक १३ मे रोजी सकाळी ९ ते २ वा. प्रधान संकल्प, वास्तुशांती, देवाना स्नान, निद्रावास, धान्यवास, होम हवन कार्यक्रम पार पडतील. रात्री ७ ते ९ वा. सुमधुर संगीत भजन (श्री साई दत्त संगीत भजन मंडळ, खेड-चिपळूण ह्यांचे) असणार आहे. रात्री १० ते ११.३० वा मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि रामरक्षा पठण स्पर्धा आयोजित केली आहे.
दिनांक १४ मे रोजी सकाळी ९ ते २ वा. देवता उठवणे, उत्तरांग हवन, बळीदान, पुर्णाहुती, देवतास्थापना, कलशारोहन, श्री सत्यनारायण महापूजा असून दुपारी २ ते ४ वा. महाप्रसाद (अन्नदाते – समिर सुनिल केसरकर) असणार आहे. तसेच सायं. ४ ते ५ वा. मान्यवरांच्या शुभहस्ते मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडेल आणि यावेळी मंदिरासाठी ज्या ज्या लोकांनी देणगी दिली आहे त्यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला आहे. शेवटी रात्री ७ ते ९ वा. ह. भ. प. श्री. अमोल महाराज वडाख, शिर्डी ह्यांचे किर्तनाचा भाविकांना लाभ घेता येईल.
मंदिर उद्घटनाच्या वेळी मा. श्री. विनायकजी राऊत (खासदार रत्नागिरी), मा. श्री. शेखरजी निकम (आमदार चिपळूण), मा. श्री. सचिनजी कदम (जिल्हा प्रमुख रत्नागिरी), श्री. दिलीप तुकाराम कदम (अध्यक्ष), श्री. रामदास पांडुरंग कदम (अध्यक्ष), श्री. सचिन बापुराम कदम (सचिव), श्री. बळीराम बाबु कदम (खजिनदार), श्री. वामन ठिलू कदम (सचिव), श्री. प्रताप नामदेव कदम (खजिनदार), वैभव कदम आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.