पाचल येथील विलीगीकरण केंद्राचे उदघाटन:
राजापूर प्रतिनिधी (तुषार पाचलकर) : शासनाच्या निर्णयानुसार 2000 लोकसंख्येवरील ग्रामपंचायतीनी कोरोना रुग्णांसाठी वेगळे वीलगीकरन केंद्र (isolation center) स्थापन करण्याच्या सूचना आहेत, या शासनाच्या सूचनेनुसार रविवार दिनांक 18 जुलै रोजी, स्मार्ट ग्रामपंचायत पाचल येथील विलीगीकरण केंद्राचा शुभारंभ श्रीमती प्रतिभा वराळे मॅडम (तहसीलदार – राजापूर तालुका) व श्री. अविनाश लाड साहेब (मा. उपमाहापौर नवी मुंबई) यांचा उपस्तितीत संपन्न झाला.
ह्या कोव्हीड सेंटरच्या उभारणीसाठी नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाशदादा लाड ह्यांचे सहकार्य मोलाचे आहे. या वीलगीकरन केंद्रासाठी श्री. अविनाश लाड साहेब यांनी १,२५,०००/- चे २० बेड व साहित्य विनामोबदला दिले. त्यांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने जाहीर आभार मानन्यात आले.
यावेळी श्रीम. प्रतिभा वराळे मॅडम (तहसीलदार – राजापूर), श्री. सागर पाटील (गट विकास अधिकारी, राजापूर प.स. राजापूर), श्री परांजपे (वैदकीय अधिकारी राजापूर), श्री. बाजी विश्वासराव (प.स. सदस्य), शिल्पा वेंगुर्लेकर (P.S.I. पोलीस उपनिरीक्षक – राजापूर), सौ. अपेक्षा मासये मॅडम (सरपंच पाचल ग्रामपंचायत), श्री. किशोर नारकर (उपसरपंच – पाचल ग्रामपंचायत), श्री आत्माराम सुतार (सदस्य, ग्रामपंचायत पाचल), श्री सिद्धार्थ जाधव सर, सदस्य ग्रामपंचायत पाचल, श्री. आण्णा पाथरे (सदस्य ग्रामपंचायत पाचल), सौ. रजिया गडकरी (सदस्य, ग्रामपंचायत पाचल), श्री. विनायक सक्रे (सदस्य, ग्रामपंचायत पाचल), श्री. तळेकर (बिट अमलदार, रायपाटण पोलीस स्टेशन), ग्रामपंचायत पाचलचे ग्रामविकास अधिकारी श्री. अर्जुन नागरगोजे भाऊ व अन्य गावचे सरपंच, शासकीय कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जाहिरात