देश

सौदी अरेबियातून (संयुक्त अरब अमिराती) 80 मे.टन ऑक्सिजन जेएनपीटी बंदरात दाखल

10 मे, 2021: भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात एएक्सएस कंपनीच्या एमव्ही जीएसएफ जिजेल जहाजातुन क्रायोजेनिक स्वरूपातील 80 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन असलेले चार कंटेनर यशस्वीपणे उतरविण्यात आले. देशातील सध्याच्या कोविड महामारीच्या परिस्थितीत संयुक्त अरब अमिरातीने भारतास मेडिकल ऑक्सिजन कंटेनरची मदत पाठविली आहे.

जीएसएफ जिजेल हे जहाज ऑक्सिजनचे चार कंटेनर घेऊन दुबईतील जेबेल अलीहून दि. 5 मे, 2021 रोजी भारताकडे रवाना झाले होते ते आज जेएनपीटी बंदरात दाखल झाले. लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे हे कंटेनर देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येतील आणि सध्याच्या कोरोणा स्थितिवर मात करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल. भारत सरकारच्या बंदरे, नौकानयन व जलवाहतूक मंत्रालयाच्या निर्देशानुसार विदेशातून मदत घेऊन येणा-या जहाजांना जेएनपीटी बंदरामध्ये नि:शुल्क सेवा दिली जात आहे त्याचबरोबर ऑक्सिजन कंटेनरची विनामूल्य हाताळणी करण्यासाठी सर्व संसाधने उपलब्ध करून दिली आहेत.

याबाबत बोलताना जेएनपीटी चे अध्यक्ष श्री.संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले की, कोविड-19 च्या जागतिक माहामारीच्या काळात गेले वर्षभर जेएनपीटी आपल्या भागधारकांसोबत देशातील पुरवठा साखळी निरंतर सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाड़त असून या आव्हानात्मक काळात आम्ही आमचे कर्तव्य बजावून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी वचनबद्ध आहोत.”

गेल्या काही महिन्यांपासून अनेक आव्हानांना सामोरे जात असूनही आम्ही माल हाताळणीमध्ये निरंतर वाढ केली आहे. एप्रिल 2021 मध्ये, जेएनपीटीने 468,015 टीईयू माल हाताळणी केली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत हाताळणी केलेल्या 283,802 टीईयूच्या तुलनेत 64.91% अधिक आहे.

जेएनपीटीविषयी :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले.

सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.

For media enquiries, please contact:

Mumbai:
Rudranil Sengupta
Tel: +91 7045464142/ +91 9702060204
e-mail: rudranil@conceptpr.com

Mumbai:
Shubham Panjari
Tel: +91 9833261798
e-mail: shubham@conceptpr.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button