बहुजन समाज पार्टीची नमुंमपा निवडणूक आढावा बैठक संपन्न
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(अनंतराज गायकवाड) दिनांक ४ फेब्रूवारी रोजी नवी मुंबईतील वाशी सेक्टर 9 येथील गुरव ज्ञाती भवन हॉल येथे सायं. 6 वा. बसपाच्या फक्त पदाधिकाऱ्यांची महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
येत्या निवडणुकीत बसपाची भूमिका काय असेल व कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क साधून आपापल्या प्रभागांमध्ये कशा प्रकारे काम करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. येत्या काळात बसपा स्वबळावर निवडणूक लढविणार की एखाद्या आघाडी ला पाठिंबा देईल हे अद्याप गुलदस्त्यातच आहे परंतु काही पक्ष बसपाला आपल्यासोबत घेण्यास इच्छुक असल्याचे यावेळी वर्तविण्यात आले.
भविष्यकाळात बसपा किंग मेकर ची भूमिका निभावणार असून या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा. प्रा. प्रशांत इंगळे साहेब महाराष्ट्र प्रदेश यांच्यासह मा. अप्पाराव थोटे, प्रदेश सदस्य, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मा. ऍड.धनंजय माने, ठाणे जिल्हा प्रभारी, संतोष जी भालेराव, ठाणे जिल्हा अध्यक्ष, ऍड. आत्माराम दावणे, ठाणे जिल्हा महासचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरू करण्यात आली.
या बैठकीचे आयोजन नवी मुंबई शहर कमिटी च्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अनुमोदन मा. राजेश जैस्वार प्रभारी नवी मुंबई, यांच्या द्वारे करण्यात आले. यावेळी मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी राहुल घुगे, अध्यक्ष, नवी मुंबई, मा. साईनाथ माने उपाध्यक्ष नवी मुंबई, मा. शशांक वि. कांबळे महासचिव नवी मुंबई, मा. नागेश कांबळे प्रभारी ऐरोली विधानसभा मा. सुनील खंडागळे अध्यक्ष ऐरोली विधानसभा, मा. प्रदीप धेंडे उपाध्यक्ष ऐरोली विधानसभा मा. संजय मांदळे महासचिव ऐरोली विधानसभा, मा. संजय गायकवाड, प्रभारी बेलापूर विधानसभा, मा. रोशन नाईक अध्यक्ष बेलापूर विधानसभा, मा. विनोद धुरंदर महासचिव बेलापूर विधानसभा आदींसह शहर, विधानसभा, सेक्टर, बूथ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आवर्जून हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या शेवटी महिला विभाग अध्यक्षा मा. प्रतिभाताई आनभोरे उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.