महाराष्ट्र

समीर खानविलकर ह्यांनी रायपाटण कोव्हीड केंद्रावर रुग्णांना ने-आण करण्यासाठी उपलब्ध करून दिले चार चाकी वाहन:

रायपाटण कोव्हीड सेंटरला मा. निलेशजी राणे साहेब (भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सचिव) यांच्या आदेशानुसार रुग्णांना ने-आण करण्यासाठी चार चाकी वाहन समिर खानविलकर यांनी उपलब्ध करून दिले आहे.

सध्या कोरोनाच्या महामारी मध्ये संपूर्ण राज्यभर लॉक डाऊन असल्याने व त्यातच अनेक ठिकाणी कोरोणाचे रुग्ण आढळत असल्याने त्यांना उपचारासाठी कोव्हीड सेंटरवर ने-आण करण्यासाठी शासनाची उपलब्ध वाहने कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या लोकांचे हाल कमी कसे करता येतील या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या आदेशानुसार समीर खानविलकर यांनी स्वत:ची टाटा सुमो गाडी रुग्णांची ने-आन करण्यासाठी रायपाटण कोविड केंद्रावर उपलब्ध करून दिली आहे.

ज्या रुग्णांना सदर कोविड सेंटरवर जाणेसाठी वाहन उपलब्ध नाही त्यांनी खालील नमुद क्रमांकाशी संपर्क साधावा. अश्याप्रकारे रुग्णांना ने-आन करण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिल्याने आरोग्य विभाग व स्थानिक नागरिकांनी भारतीय जनता पार्टी राजापूरच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.

रुग्णांसाठी संपर्क क्रमांक
7083702666 / 8975039119 / 9372285095 / 7588808075

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button