मनोरंजन

‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ मालिकेवर ३ मे पासून अनोखी प्रश्नमंजुषा!

फक्त मराठी वाहिनीच्या ‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ मालिकेवर ३ मे पासून अनोखी प्रश्नमंजुषा!
दररोज विजेत्यांना मिळणार शिर्डी – साईबाबा मंदिरातून विशेष भेट!

फक्त मराठी वाहिनीने “साईबाबा श्रद्धा आणि सबुरी ही मराठी मालिका महाराष्ट्रातील खास साई भक्तांसाठी आणली. या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून अल्पावधीतच अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. वेगळ्या पण नैसर्गिक सदरीकरणामुळे ही मालिका मराठी माणसांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. संकटकाळी शिर्डीच्या वारीची आणि साईंच्या दर्शनाची आस आता होईल पूर्ण घरच्या घरी…येईल प्रचीती साई लिलेची. संकटकाळी शिर्डीच्या वारीची आणि साईंच्या दर्शनाची आस आता होईल पूर्ण घरच्या घरी आणि येईल प्रचीती साई लिलेची. ३ मे सोमवार पासून आपल्या फक्त मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘साईबाबा-श्रद्धा आणि सबुरी’ ह्या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या एका सोप्या प्रश्नाचे योग्य उत्तर 8446419091 ह्या Whatsup नंबर वर पाठविणाऱ्या ५ भाग्यवान विजेत्यांना शिर्डी साईबाबांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली अमुल्य साईमुर्तीची अलौकिक भेट आणि संपूर्ण पूजा सामुग्री थेट शिर्डीवरुन विजेत्यांच्या घरी पाठविली जाणार आहे.

महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी आपल्या लाडक्या साईबाबांवर ‘फक्त मराठी वाहिनीने ‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ ही मराठी मालिका तयार करण्याचे ठरविले आणि १५ मार्च २०२१ पासून ही मालिका या वाहिनीवर प्रसारित होऊ लागली. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी भव्य सेट कलादिग्दर्शक आणि निर्माते अजित दांडेकरांनी मालाड मुंबईतील ‘कलावंत’ स्टुडिओमध्ये उभा करून जणू प्रती शिर्डीच स्थापन केली. आकर्षक सादरीकरणामुळे ही मालिका महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात प्रेक्षक आवडीने पाहू लागले. मात्र पुन्हा महाराष्ट्रात संचारबंदीचा निर्णय झाल्याने पुढील सर्व भागांचे चित्रीकरण आम्हाला थांबवावे लागले. प्रेक्षकांचा कौल पाहून १९ एप्रिल पासून वाहिनीने पहिल्या भागापासून मालिकेचे पुन्हा प्रसारण सुरू केले आणि प्रेक्षकांकडून पुन्हा पूर्वीसारखाच प्रतिसाद मिळू लागला. प्रेक्षकांसोबत वाहिनीचं झालेलं नातं असच कायम घट्ट राहावं याकरिता ही प्रश्न मंजूषा आमच्यात दुवा ठरणार आहे., तसेच लॉकडाऊनमुळे भक्तांना इच्छा असूनही प्रत्यक्ष शिर्डीला जाता येत नाही, त्यामुळे आमच्या वाहिनीकडून भाग्यवान विजेत्यांना मिळणारी ही विशेष भेट अनोखी असल्याचे फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले.

साईलिलेचा अनुभव घ्या..पहात रहा साईबाबा श्रद्धा आणि सबुरी रोज रात्री ८:०० वाजता आपल्या फक्त मराठी वाहिनीवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button