नवी मुंबई

1 जानेवारी 2023 पासून नियमित लसीकरणात fIPV वाढीव डोसचा समावेश

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

सद्यस्थितीत f-IPV चा नियमित लसीकरण अंतर्गत बालकास जन्मानंतर 6 आठवडे पूर्ण झाल्यावर पहिला डोस तसेच 14 आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरा डोस असे एकूण दोन डोस देण्यात येत आहेत. तथापि, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि. 1 जानेवारी 2023 पासून f-IPV लसीचा तिसरा डोस बालकास 9 महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे. 

नवी मुंबई महागरपालिका कार्यक्षेत्रात बालकांमधील लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येणाऱ्या आजारांचे प्रमाण  व त्याआजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ‘सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम’ सुरु करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत गर्भवती माता, नवजात बालके, दोन वर्षातील बालके, 5, 10 व 16 वर्षांची मुले/मुली यांना लसीकरण करण्यात येते.

ज्या आजारांवर लस उपलब्ध आहे त्या आजारांवरील लसीकरण करुन बालकांमधील आजाराचे व त्यामुळे होणाऱ्या गुंतागुंत व मृत्यूचे प्रमाण कमी करणे.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार माहे जानेवारी 2023 पासून f-IPV चा तिसरा डोस समाविष्ट करण्यात येणार आहे. हा तिसरा डोस बालकास 9 महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे. सदर डोस हा 9 ते 12 महिने या वयोगटात गोवर रुबेला डोसच्या पहिल्या डोस बरोबर देण्यात येणार आहे. सदर वाढीव डोस डाव्या हातावर देण्यात येणार आहे. सदर लसीचा वाढीव डोस देण्याचा उद्देश पोलिओ उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे व सामूहिक प्रतिकार शक्ती वाढविणे हा आहे.

शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार सदर वाढीव डोस देण्याबाबत वैद्यकीय अधिकारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालय प्रमुख यांचे दि.13/12/2022 रोजी डॉ.अरुण काटकर, जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी यांनी घेतले असून वैद्यकीय अधिकारी मार्फत सर्व एनएम, एलएचव्ही, एएनएम, आशा व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच याबाबत खाजगी वैद्यकीय व्यवसाईक, बालरोगतज्ञ यांना अवगत करण्यात आले आहे.

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व लसींचा पुरवठा शासना मार्फत मोफत करण्यात येतो. सदर लसी + 20C ते + 80C या तापमानात ठेवून शीतसाखळी अबाधित ठेवण्यात येते. त्यासाठी ILR, Deep Freezer ही विद्युत उपकरणे व कोल्डबॉक्स, Vaccine Carrier, Ice packs, ही उपकरणे शासनामार्फत मोफत पुरविण्यात येतात. सदर लस साठा नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालये व ना.प्रा.आ.केंद्र अशा एकुण 29 कोल्डचेन पॉइंटच्या ठिकाणी साठवणूक करण्यात येतो.

23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी उदा. शाळा, अंगणवाडी, खाजगी दवाखाना, सोसायटी ऑफिस इ. जागी बाह्यलसीकरणसत्र घेण्यात येते तर 23 ना.प्रा.आ.केंद्र, नमुंमपारुग्णालये याठिकाणी स्थायी लसीकरण सत्र घेण्यात येते. याशिवाय दगडखाणी, बांधकाम, तुरळक झोपडपट्या अशा ठिकाणी मोबाईल सत्रे आयोजित करण्यात येतात. नमुंमपा कार्यक्षेत्रात दरमहा 359 बाह्यसंपर्क सत्रे, 129 स्थायी सत्रे व 28 मोबाईल सत्रे असे एकुण 516 सत्रांद्वारे लसीकरण करण्यात येते. सदर सत्र संख्येमध्ये आवश्यकतेनुसार  व मागणी नुसार वेळोवेळी वाढ करण्यात येते. सदर सत्र दरमहा ठराविक दिवशी आयोजित करण्यात येतात. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व लसी मोफत देण्यात येतात.

दि. 1 जानेवारी 2023 पासून लसीकरण सत्राचे वेळापत्रक

अर्भक, लहानबालके व गर्भवती महिलांसाठी राष्‍ट्रीय लसीकरण वेळापत्रक
अ.क्र.लसकधीद्यावेजागा
1टी.डी. -1गरोदरपणाच्‍या सुरुवातीलादंडाच्‍यावरच्‍या बाजुला
टी.डी. -२टी.डी. दिल्‍यानंतर ४ आठवडयांनीदंडाच्‍यावरच्‍या बाजुला
3टी.डी.-बूस्टरजर माता मागील टी.डी. दिल्‍यानंतर ३ वर्षाच्‍या आत गरोदर राहिल्‍यासदंडाच्‍यावरच्‍या बाजुला
4बी.सी.जी.जन्‍मतः, शक्‍य तितक्‍या लवकर, एक वर्ष पुर्ण होण्‍याआधीडाव्‍या दंडाच्‍यावरच्‍या बाजुला
5हिपॅटायटिस़्- बीजन्‍मतःजन्‍मल्‍यानंतर २४ तासाच्‍याआतडाव्‍या मांडीच्‍या मध्‍यभागी बाहेरील बाजुला
6ओ.पी.व्‍ही. झिरोमात्राजन्‍मतः, शक्य तितक्‍या लवकर, १४ दिवसापर्यंततोंडावाटे
7ओ.पी.व्‍ही. १,२ व ३जन्‍मल्‍यानंतर ६, १० व १४वा आठवडा पूर्ण झाल्‍यावरतोंडावाटे
8पेंटाव्हॅलंट १,२ व ३जन्‍मल्‍यानंतर ६, १० व १४वा आठवडा पूर्ण झाल्‍यावरडाव्‍या मांडीच्‍या मध्‍यभागी बाहेरील बाजुला
9रोटा व्हायरस लस 1,2 व 3जन्मल्यानंतर 6, 10 व 14 वा आठवडा पूर्ण झाल्यावरतोंडावाटे
10एफ-आयपीव्ही 1, 2 व 3जन्मल्यानंतर 6 व 14 व्या आठवडयात ओपीव्ही पहिला व तिसऱ्या डोस सोबत व 1 वर्ष पूर्ण होण्याआधी. 9 व 12 महिन्यात तिसरा डोसउजव्या दंडाच्या वरच्या बाजूला
11पी.सी.व्ही.1,2 व बुस्टर डोसपहिला व दुसरा डोस जन्‍मल्‍यानंतर 6 व्या व 14 व्या आठवडयात ओपीव्ही. पहिला व तिसऱ्या डोस सोबत व बुस्टर डोस गोवर रुबेला लसीसोबतउजव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला
12गोवर रुबेलाजन्‍मल्‍यानंतर ९ महिने पूर्ण झाल्‍यावर, १ वर्षपूर्ण होण्‍याआधीउजव्‍या दंडाच्‍यावरच्‍या बाजुला
13जीवनसत्व- अ- १जन्‍मल्‍यानंतर ९ महिने पूर्ण झाल्‍यावर, गोवर लसी बरोबरतोंडावाटे
14डी.पी.टी. बूस्टर१६ ते २४ महिनेडाव्‍या मांडीच्‍या मध्‍यभागी बाहेरील बाजुला
15ओ.पी.व्‍ही. बूस्टर१६ ते २४ महिनेतोंडावाटे
16गोवर रुबेला बूस्टर१६ ते २४ महिनेउजव्‍या दंडाच्‍यावरच्‍या बाजुला
17जीवनसत्‍व- अ- २ ते ९१६ महिने, व नंतर प्रत्‍येक सहा-सहा महिन्‍याने ५ वर्षे पूर्ण होई पर्यंततोंडावाटे
18डी.पी.टी. बूस्टर५ ते ६ वर्षेदंडाच्‍यावरच्‍या बाजुला
19टी.डी.१० व १६ वर्षेदंडाच्‍यावरच्‍या बाजुला

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत महानगरपालिके मार्फत सर्व लसी बालकास मोफत देण्यात येत असून 5 वर्षाखालील आपल्या बालकांचे वयोगटानुसार संपूर्ण लसीकरण करुन गोवर, घटसर्प, पोलिओ, न्युमोनिआ इ. आजारांपासून सुरक्षित करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button