वाढत्या कोव्हिडं प्रादुर्भावाबाबत तहसीलदार लांजा यांच्या समवेत आमदार राजन साळवी यांची आढावा बैठक
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोव्हिडंचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्यामुळे लांजा तालुक्यातील येथील देवधे येथे उभारण्यात आले कोव्हिडं केअर सेंटर सध्या बंद असलेले ते कोव्हिडं केअर सेन्टर पुन्हा सुरू करणे बाबत आमदार राजन साळवी ह्यांनी सूचना दिल्या तसेच लांजा तालुक्यात सुरू असलेल्या कोव्हिडं लसीकरण याचा आढावा घेऊन येणाऱ्या काळातील उपाययोजनां संदर्भात आढावा बैठक तहसीलदार कार्यालय, लांजा येथे प्रांताधिकारी पोपट ओमासे व तहसीलदार समाधान गायकवाड ह्यांच्या समवेत बैठक पार पडली.
या वेळी उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, गटविकास अधिकारी यशवंत भांड, पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, सभापती मानसी आंबेकर, उप सभापती दीपाली दळवी, माजी सभापती लीलाताई घडशी, नगरपंचायतीचे श्री पाटील, संतोष आंग्रे, पाणी सभापती राजू हळदणकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संजय पाटोळे, प्रसाद माने, तालुका आरोग्य अधिकारी मारुती कोरे व मान्यवर उपस्थित होते.