आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते ‘A2Z’ कार एक्सेसरीज शोरूमचे उदघाटन
नवी मुंबई प्रतिनिधी : दिनांक १४ ऑक्टोबर रोजी नेरुळ मध्ये आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते ‘A2Z’ कार एक्सेसरीज शोरूमचे उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी महापौर जयवंत सुतार, युवा नेते निशांत भगत, सुनील सुतार, माजी नगरसेवक मुनावर पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी ह्यावेळी ‘A2Z‘ कार एक्सेसरीज शोरूमचे मालक तय्यब कुरैशी ह्यांना ‘A2Z‘ च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नावाप्रमाणे ‘A2Z‘ शोरूम ग्राहकांना ‘A2Z‘ सेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीचे पहिले शोरूम होईल असे त्यांनी सांगितले.
‘A2Z‘ कार एक्सेसरीज शोरूमचे मालक तय्यब कुरैशी ह्यांनी यावेळी नवी मुंबई वार्ताशी बोलताना सांगितले कि, “आमच्या ‘A2Z‘ कार एक्सेसरीज शोरूम मध्ये सर्व प्रकारच्या कारच्या एक्सेसरीज उपलब्ध असतील. तसेच त्यांनी सांगितले कि आम्ही ग्राहकांना चांगली सेवा देऊ; जेणेकरून ‘A2Z’ ग्राहकांच्या पसंतीला उतरून पहिल्या पसंतीचे शोरूम होईल.”