नात्याच बंधन दृढ करणारी राखीही महागाईच्या फेऱ्यात
उरण (दिनेश पवार) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने सध्या बाजारपेठांमध्ये राखी आणि विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र बहिण-भावाचे नाते दृढ करणारी राखी ही यंदा महागाईच्या फेऱ्यात अडकली आहे. गतवर्षी १० ते १५ रुपयांना मिळणारी राखीची किंमत यंदा २० ते २५ रुपयांवर गेली आहे. बाजारपेठेत पारंपरिक गोंड्याच्या राख्याऐवजी डोरेमन, छोटा भीम, लायटिंगच्या राख्यांची क्रेझ आहे. याशिवाय रेशीम धागे व चंदन राख्या, मोती, रुद्राक्ष, सुंदर व आकर्षक राख्यांसह अनेक रंग आणि डिझाईनमध्ये राख्यांचे असंख्य प्रकार बाजारात दिसून येत आहे. शहरातील सराफा बाजारातही चांदी आणि सोन्याच्या मुलामा दिलेल्या राख्या उपलब्ध आहेत.
उरण शहरात बाजारपेठ रंगीन राख्यांनी सजली आहे. बहिण आपल्या लाडक्या भावासाठी कोणती सुंदर व आकर्षक राखी आवडेल त्याकडे लक्ष देऊन राख्या खरेदी करतांना दिसत आहेत. भारतीय डाक विभागाच्या वतीने राखी-विशेष अशी सेप्रेट व्यवस्था करण्यात आली आहे. वेगळी व्यवस्था केल्याने राखी पोस्टाने पाठविण्यात त्रास होत नाही. बहिण भावाच्या अतूट नात्यांना रेशीम धाग्यांनी जोडणारा सण म्हणजे रक्षाबंधन. महिलांसाठी हा सण म्हणजे भावनिक जपणूक ओलावा देणारा आहे. सध्या ब्रेसलेटसारख्या राख्यांना बाजारात मोठी मागणी आहे. १० ते १५ रुपयांपर्यंत असणाऱ्या राख्या आता २० ते २५ रुपयांवर पोचल्या आहेत.
सध्या बाजारात आलेल्या राख्या गुजरात आणि सुरत येथून उपलब्ध झाल्या आहेत राख्यांचे विविध प्रकार, विविध आकार आहेत, दिवसेन-दिवस नव-नवीन प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध होत आहेत.
गेली १५ वर्षापासून आम्ही राख्या विकण्याचा धंदा करीत आहोत. १० रुपयापासून ते २०० रुपयापर्यंत आम्ही राख्या विकतो. गोंडा राखी व देवाची राखी २० रुपये डझन या भावाने आम्ही विकतो. असे दिनेश वाघरी यांनी सांगितले.
कपडे, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स आणि इतर ऑनलाइन शॉपिराच्या जमान्यात आता इंटरनेटवर राख्यांची बाजारपेठही सजली आहे. ऑनलाइन राख्या आणि गिफ्टच्या खरेदीला युवा ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी महिनाभर आधीपासून बाजारपेठेतील दुकाने पालथी घालून लाडक्या भावासाठी बहिण मनासारखी राखी मिळेपर्यंत पायपीट करीत. आता ऑनलाइनच्या जमान्यातील बाजारपेठही व्यापक झाली आहे. खडे, मोती, गोंडा, रेशीम धागा, प्लॅस्टिकची फुले, मॉडर्न डिझाईन, आणि मॉडर्न लुक असलेल्या असंख्य राख्या ऑनलाइन बाजारपेठेत उपलब्ध आहेत. दोनशे रुपयापासून तीन हजार आणि यापेक्षाही अधिक किमतीच्या राख्या विक्रीसाठी आहे. मोरपीस, अमेरिकन डायमंड चादी, गोल्ड प्लेटेड, वुडन असे अनेक प्रकार यामध्ये उपलब्ध आहे.
जाहिरात:
Contact: Marks Creative, Shop 26, Ashiana Bldg., Plot 15, Sector 17, Vashi, Navi Mumbai.
Mobile: 9867373260 / 9819867577