राजापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी मदत:
राजापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघाच्या वतीने चिपळूण येथील पुरग्रस्तांसाठी मदत साहित्य आज सकाळी पाचल येथून रवाना झाले. यामध्ये सुमारे 100 कुटुंबांना आवश्यक असणारे चटई, ब्लँकेट, टाॅवेल व डेटाॅल लिक्विड या साहित्याचा समावेश आहे.
जिल्हा कार्यवाह श्री. प्रकाश साळवी व तालुका कार्यवाह श्री. विजय बाणे यांचे नेतृत्वाखाली चिपळूण येथील पुरग्रस्तांना आज या साहित्याचे वाटप होत आहे. संघटनेच्या सभासदांनी तातडीने मदतनिधी गोळा करुन पुरग्रस्तांना वेळेत मदत केली त्याबद्दल संघटनेच्या सर्व सभासदांना व सहका-यांना धन्यवाद!
याप्रसंगी श्री. उमेश दळवी (कारवली हायस्कूल), विजय बाणे (कुंभवडे), संदिप कोलते (रायपाटण), नितीन साळवी (ओणी), सत्यशिल सक्रे (पाचल), मोतीराम कडू (ताम्हाणे), संतोष गोसावी (कारवली) इ. संघटनेचे सभासद उपस्थित होते.
नवी मुंबई वार्ताशी बोलताना संतोष गोसावी ह्यांनी सांगितले कि, “अतिवृष्टी झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कित्येकांचे संसार वाऱ्यावर आलेत, त्यात कोरोनाची महामारी. असे असले तरी मदतीचे हजारो हात पुढे आले आहेत. तसेच कितीही मदत तिथे पोचली तरीही ती कमीच आहे, आमच्याकडून पुरग्रस्तांसाठी छोटीशी मदत.”
जाहिरात