पावसाळी १ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी: होड्या लागल्या किनारीला
उरण (दिनेश पवार)
मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छिमारांची जीवितहानी व वित्त हानी यांचे रक्षण या हेतूने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ च्या कलम ४ च्या पोट कलम (१ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून १ जून २०२१ ते ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यात यांत्रिक मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळुन मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवित व वित्त हानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते.
मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छिमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण या हेतूने या वर्षी १ जून २०२१ ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत राज्यात सागरी क्षेत्रात (सागरी किनाऱ्या पासून १२ सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी करण्यात आली आहे. सदर पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही.
या शासनाच्या निर्णयामुळे मच्छिमार या बाबत सकारत्मक असून या बंदी कालावधीचे मच्छिमारांन कडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. शासनाच्या या बंदी कालावधीत मध्ये कुणीही अवैधपणे मासेमारी केल्यास व तसे शासनाच्या निदर्शनास आल्यास शासना कडून महाराष्ट्र शासन सदर नौकेवर खटला दाखल होऊन परवाना व (V R C ) व्हेसल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द होण्याची कार्यवाही सुद्धा होऊ शकते. या बंदी कालावधीमध्ये वादळी हवामान व खराब हवामानमुळे नौकांचे नुकसान झाल्यास शासनाकडून कोणतीही मदत मिळणार नाही. आम्ही शासनाच्या आदेशाचे स्वागत करून पालन करतो. उरण तालुक्यातील करंजा बंदरावर होड्या नांगरून ठेवण्यात आल्या आहेत असे हेमंत रामदास गौरीकर (संचालक) करंजा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. करंजा तालुका उरण जि .रायगड, यांनी सांगितले.