प्रोड्युसर डायरेक्टर सचिन कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा, समाजसेवक एडवोकेट श्री. बापू पोळ ह्यांनी केली होळी साजरी
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(अनंतराज गायकवाड प्रतिनिधी) : ऐरोली येथील प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपा जनसंपर्क कार्यालयात कलारत्न दादासाहेब फाळके पुरुस्कृत नवी मुंबईतील एकमेव प्रोड्युसर डायरेक्टर सचिन कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नुकताच त्यांचा ‘मराठा क्रांती’ हा चित्रपट वर्ल्ड वाइड प्रदर्शित झाला आहे. सचिन कदम यांचा वाढदिवस व होळी एकाच दिवशी आल्याचा योगायोग साधून नवी मुंबईचे लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या आशीर्वादाने होळी व वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सचिन कदम यांचा सत्कार समाजसेवक एडवोकेट बापू पोळ, समाजसेविका निवेदिता पोळ व कार्यकर्त्यांचे उपस्थितत करण्यात आला तसेच “गोरगरीबांना होळीच, कोकणी फूड पुरणपोळीच” या सदराखाली गोरगरीब गरजवंतांना मिष्ठान्न भोजन वाटप करण्यात आले. ‘गोल्डन मॅन’ म्हनुन नावाजलेले आणि समाजसेवक एडवोकेट श्री. बापू पोळ यांनी होलिका दहन करीत स्थानिक रहिवाशांनासह मोठ्या उत्साहात होळी साजरी केली.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक महिला बालके यांच्या सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच सचिन कदम यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय, साहित्यिक कलाक्षेत्रातुन वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.