पोलिसांनी घडविले खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन
साई देवस्थान वहाळच्या पुढाकाराने 110 आदीवासी कुटुंबाना अन्नधान्य कीटचे वाटप.
उरण (दिनेश पवार)
नवी मुंबई वाहतूक विभाग, श्री साई देवस्थान वहाळ व रोटरी क्लब ऑफ़ उलवे नोड आणि रवी पाटील सामाजिक मंड़ळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि. १०) रोजी साईनगर वहाळ येथील ११० आदिवासी कुटूंबाना शासकीय नियमांचे पालन करुन, सामाजिक अंतर राखत अन्न धान्य कीट चे वाटप करण्यात आले.
यावेळी नवी मुंबई वाहतुक विभागाचे सहाय्यक आयुक्त भागवत सोनावणे, गव्हाण फाटा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, श्री.साई देवस्थान साई नगर वहाळचे अध्यक्ष श्री रविंद्र पाटील, रोटरी क्लब ऑफ़ उलवे अध्यक्ष शिरिष कडू, ग्रामपंचायत सदस्य वितेश म्हात्रे, प्रणय कोळी (ग्रामपंचायत सदस्य), रोटरीयन अजय दापोलकर, निलेश सोनावणे, विनय जाधव, साई चरण पाटील, आदी सह रोटरीयन उलवे, वाहतुक विभागाचे कर्मचारी तसेच आदिवासी बांधवांच्या उपस्थिती अगदी शासकीय नियमांच्यांअधीन राहून सामाजिक अंतर राखत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.